रोहिणी शहा

वनसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपरमधील भूगोल घटकासाठी महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह जगाचा आणि भारताचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल असा अभ्यासक्रम विहित करण्यात आलेला आहे. हा अभ्यासक्रम आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषणाच्या आधारावर भूगोलाची तयारी कशा प्रकारे करावी ते पाहू.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

अभ्यासामध्ये काही ठळक बाबींचा क्रम लावून घ्यायला हवा. सगळयात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळया भौगोलिक प्रक्रिया (उदा. भूरूप निर्मिती, भूकंप / वादळ इत्यादींची निर्मिती) समजून घेणे आवश्यक आहे. आणि त्या आधारावर प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल समजून घेणे आवश्यक आहे. घटकनिहाय तयारी पुढीलप्रकारे करता येइल.

प्राकृतिक भूगोल

मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या / महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ऋतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. भौगोलिक प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.

या उपघटकाचा अभ्यास नकाशा समोर ठेवून केल्यास विषय समजून घेण्यासाठी उपयोगी ठरतोच, शिवाय फोटोग्राफीक मेमरीचा वापर होऊन तो व्यवस्थित लक्षात राहतो.

जागतिक भूगोलामध्ये स्थानिक वारे, विविध आखाते, सामुद्रधुनी आणि महासागर, महत्त्वाची बेटे, हवामान प्रदेश, भूरूपे, महत्त्वाच्या नद्या, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारे, महत्त्वाचे वन प्रदेश, गवताळ प्रदेश आणि त्यांची वैशिष्टये, तसेच जगात घेतली जाणारी चहासारखी नगदी पिके आणि त्यांची वैशिष्टय़े या उपघटकांवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे जगाच्या भूगोलातील महत्त्वाच्या, ठळक अशा बहुतांश मुद्दय़ांच्या टेबलमध्ये नोट्स काढणे व त्यांची नकाशावर आधारित उजळणी आवश्यक आहे.

भारतातील हवामान, पर्जन्य, पठारे, पर्वतरांगा, नदी प्रणाली, नद्यांची खोरी, द्विपकल्पीय व हिमालयीन नद्यांची तुलना व वैशिष्टय़े, वनांचे प्रकार, त्यांची वैशिष्टय़े व वितरण या मुद्दय़ांचा नेमका अभ्यास आवश्यक आहे. 

महाराष्ट्रातील नद्यांची खोरी, उपनद्या, धबधबे, खाडय़ा, धरणे व जलाशय, पर्वतप्रणाली, पर्जन्य वितरण, वनांचे प्रकार, विस्तारक्षेत्र, त्यामधील वृक्ष, वनस्पती, प्राणी, पक्षी इत्यादी ठळक वैशिष्टय़े माहीत असायला हवीत.

प्राकृतिक भूगोलामध्ये कोणत्याही उपघटकामधील बाबींचा अभ्यास पूर्व पश्चिम तसेच उत्तर दक्षिण क्रम, सर्वात लहान, सर्वात मोठे/ उंच/ विस्तृत असे वर्गीकरण यांच्याशिवाय पूर्ण होत नाही.

वनसेवेमध्ये प्रवेशासाठीची ही परीक्षा असल्याने वनांशी संबंधित माहिती उदाहरणार्थ वृक्षांची वैशिष्टय़े, आढळणारे पशुपक्षी व त्यांची ठळक वैशिष्टय़े, आदिवासी व जंगलांशी संबंधित योजना तसेच कायदेशीर बाबी यांवर भर देऊन अभ्यास करणे आवश्यक आहे.

आर्थिक भूगोल

या विभागात साधारणपणे नैसर्गिक साधनसंपत्ती, पायाभूत सुविधा, कृषी, उद्योग इत्यादी ठळक मुद्दे येतात.

नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास खनिजे, त्यांची उत्पादक क्षेत्रे / राज्ये, उत्पादनासाठी आवश्यक भौगोलिक वैशिष्टय़े, ऊर्जा उत्पादन, स्रोत, त्यांचे वितरण, प्रमुख उत्पादक या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

पायाभूत सुविधांमध्ये विकसित बंदरे, व्यापारी बंदरे, विमानतळ, रेल्वेमार्ग, महामार्ग व त्यावरील महत्त्वाची ठिकाणे, खिंडी व घाट आणि त्यांनी जोडली जाणारी महत्त्वाची शहरे / प्रदेश, या घटकांचा विचार आवश्यक आहे.

महत्त्वाचे उद्योग, त्यांची ठिकाणे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, महत्त्वाची शहरे – त्यांची टोपण नावे, यांचा कोष्टकामध्ये आढावा घ्यावा.

कृषीचे प्रकार, प्रमुख पिके – नगदी व अन्नधान्य – त्यांचे वितरण, त्यांची महत्त्वाची वाणे, मृदा समस्या, कृषी क्षेत्रातील विविध क्रांती, पशुधन, मासेमारी क्षेत्रे यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करावा.

सामाजिक भूगोल

राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्यांच्या राजधान्या व त्यांची वैशिष्टय़े, जिल्ह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी / डोंगर / नैसर्गिक भूरूप या बाबी अभ्यासक्रमामध्ये वेगळय़ाने नमूद केलेल्या नसल्या तरी विचारण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

लोकसंख्याशास्त्र या मुद्दय़ामध्ये अद्ययावत आकडेवारी आणि महत्त्वाचे सिद्धांत यांचा समावेश होतो. अद्ययावत आकडेवारी ही जनगणना पोर्टलवरील आकडेवारीतून अभ्यासायची आहे. सन २०११च्या जनगणनेबरोबरच महत्त्वाच्या मुद्दय़ांबाबत सन २००१ची तुलनात्मक आकडेवारीही पाहावी. ही आकडेवारी म्हणजे टक्केवारी आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.

लोकसंख्या शास्त्रातील सिद्धांत आणि ते मांडणारे समाजशास्त्रज्ञ / अर्थतज्ञ यांची माहिती करून घ्यावी. भारतामध्ये त्यातील कोणता टप्पा / स्तर चालू आहे ते समजून घ्यावे.