फारुक नाईकवाडे

राज्य सेवा पूर्वपरीक्षा ही आता २३ जानेवारी रोजी होणार आहे. पूर्वपरीक्षेतील पेपर एकमधील घटकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा मागील लेखांमध्ये करण्यात आली आहे. या लेखामध्ये पेपर एक – सामान्य अध्ययन विषयातील पर्यावरण घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. 

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा

पर्यावरणीय पारिस्थितिकी (Environmental Ecology) या विभागाबाबत वैज्ञानिक तसेच भौगोलिक समज असणे आवश्यक आहे. पुढील बाबतीत वैज्ञानिक समज पक्की करून घ्यावी लागेल – परिसंस्थेचे जैविक व अजैविक घटक व त्यांची भूमिका, प्राणवायू, नायट्रोजन आणि कार्बन यांची जैव-भू-रासायनिक चक्रे, जलचक्र, अन्नसाखळी, अन्नजाळे इत्यादी.

अन्नसाखळीमधील प्रत्येक टप्प्यावरील सजीवांची वैशिष्ट्ये, प्रत्येक टप्प्यावर होणारे ऊर्जेचे हस्तांतरण, जैव विशालन या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. अन्नजाळे व त्याचे प्रकार आणि त्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील सजीव यांचा आढावा घ्यायला हवा. अन्नसाखळी आणि अन्नजाळे यात फरक करणारी उदाहरणे लक्षात घ्यायला हवी.

परिसंस्थेला असलेले धोके व त्यांच्या निवारणासाठीचे प्रयत्न समजून घ्यावेत.

जैवविविधता ही संकल्पना समजून घेऊन तिचे घटक, स्वरूप, वैशिष्ट्ये, महत्त्व समजून घ्यायला हवे. जैवविविधतेचे जतन व संवर्धनासाठी करण्यात येणारे प्रयत्न व त्यासाठी कार्यरत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था तसेच जैवविविधता संवर्धनासाठीच्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पद्धती यांची माहिती असायला हवी.

हवामान बदलाचा अभ्यास करताना जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेचा ऱ्हास, पर्यावरणीय असंतुलन या महत्त्वाच्या मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास करायला हवा.

जागतिक पारिस्थितिकीय असंतुलन, जैवविविधतेतील ऱ्हास यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, परिणाम, समस्या आणि संभाव्य उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे करावा.

जागतिक तापमानवाढ, हरितगृह परिणाम या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्या. त्यांचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे करावा – कारणे- विशेषत:  CO,  CO2,  CH4,  CFCs,  NO  यांची वातावरणातील पातळी, स्वरूप, परिणाम, समस्या, संभाव्य उपाययोजना

जैवविविधतेचा ऱ्हास व जागतिक तापमानवाढ यांच्यामुळे उद्भवलेल्या समस्यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, आवश्यक उपाययोजना या मुद्द्यांच्या आधारे करावा. यामध्ये पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन (EIA) व कार्बन क्रेडिट्स या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात व त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कशा प्रकारे होतो हे समजून घ्यावे.

पर्यावरणीय ऱ्हासाची कारणे, त्यावर परिणाम करणारे घटक, स्वरूप, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या व त्यांवरील उपाय व पर्यावरणाच्या संधारणाची गरज, त्यासाठीचे उपाय, होणारे प्रयत्न असे मुद्दे लक्षात घ्यावेत. 

वायू, ध्वनी, पाणी, मृदा इत्यादी प्रकारची प्रदूषणे समजून घ्यावीत. या प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठीचे निकष, प्रदूषकांची मान्य मर्यादा/प्रमाण, धोकादायक पातळ्या यांचा कोष्टके मांडून अभ्यास करता येईल.

सर्वच प्रकारच्या प्रदूषणाचे स्रोत आणि त्यांचे पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम आणि प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी होणारे प्रयत्न यांचा आढावा घ्यायला हवा.

वायू प्रदूषणामध्ये हवेतील घटक वायूंचे, वाफेचे व  solid particles¨ चे प्रमाण, त्यातील वाढ, त्यांचे स्रोत, त्यांच्या धोकादायक पातळ्या व त्याबाबतचे निर्देशांक, अशा पातळ्या ओलांडलेली भारतातील प्रदूषित शहरे हे मुद्दे पाहावेत.

जल प्रदूषणामध्ये प्रदूषकांचे प्रकार, त्यांच्यामुळे होणारे तोटे/परिणाम, त्यांचे स्रोत, औद्योगिक व कृषी क्षेत्रामुळे होणारे जल प्रदूषण, त्यावर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना हे मुद्दे पाहावेत. यामध्ये   Eutrophication  सारख्या संकल्पना समजून घ्यायला हव्यात.

मृदा प्रदूषणामध्ये शेतीची आदाने, औद्योगिक कचरा/सांडपाणी, मृदेची धूप अशा कारकांमुळे होणारे प्रदूषण व त्याचे पिकांवर होणारे परिणाम समजून घ्यायला हवेत.

पर्यावरण संरक्षणाबाबत कायद्यांचा आढावा घ्यायला हवा. यामध्ये महत्त्वाच्या व्याख्या, तांत्रिक मुद्दे, ठळक तरतुदी, शिक्षेच्या तरतुदी, अपवाद असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/ राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संस्था/ संघटना यांचा अभ्यास कार्यक्षेत्र, स्थापनेचे वर्ष, उद्देश, मुख्यालय, ब्रीदवाक्य, ठळक कार्ये, मिळालेले पुरस्कार, संघटनेकडून देण्यात येणारे पुरस्कार, सध्याचे अध्यक्ष, भारत सदस्य आहे किंवा कसे, असल्यास भारताची भूमिका या मुद्द्यांच्या आधारे करावा.

शाश्वत विकास ही संकल्पना समजून घेऊन त्यातील समाविष्ट घटक माहीत करून घ्यावेत.

वसुंधरा परिषदा आणि अजेंडा २१ यांचा थोडक्यात आढावा घ्यावा.

पर्यावरणाशी संबंधित शाश्वत विकास लक्ष्ये समजून घ्यावीत व त्याबाबत भारताकडून विहित उद्दिष्टे समजून घ्यावीत. शक्यतो याबाबत सहस्राक विकास लक्ष्यांचाही तुलनात्मक आढावा घ्यावा.

भारताची शाश्वत विकास उद्दिष्टांबाबतची निर्धारित उद्दिष्टे व त्यातील कामगिरी माहीत असायला हवी.

हरित आणि नील अर्थव्यवस्थेची संकल्पना आणि त्यांच्या विकासासाठीचे प्रयत्न समजून घ्यावेत.

चालू घडामोडींमध्ये चर्चेतील प्रकल्पांना पर्यावरणाच्या आधारे होणारे विरोध, त्यातील मुद्दे यांची माहिती करून घ्यावी. याबाबत पर्यावरणीय चळवळींच्या वाटचालीतील ठळक टप्पे माहीत करून घ्यावेत.