एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा
महाराष्ट्र गट ब सेवा परीक्षांच्या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी इतिहास घटक विषयाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित केलेला आहे.
इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
अभ्यासक्रम एका ओळीत संपला आहे. त्यामुळे अभ्यासाची चौकट आखण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. या एका ओळीच्या अभ्यासक्रमावर मागील तीन वर्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रातिनिधिक प्रश्न आणि त्याआधारे तयारी करताना लक्षात घ्यायचे मुद्दे पाहू.
(योग्य उत्तराचा पर्याय ठळक के लेला आहे.)
प्रश्न १. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली, ती कोणती?
अ. सामाजिक समता व समानता
ब. राष्ट्रीय भावना
क. धर्मनिरपेक्षता
ड. ऐक्यभावनेचा विकास व दृढीकरण
पर्यायी उत्तरे
१) अ आणि क फक्त
२) ब आणि ड फक्त
३) अ आणि ड फक्त
४) अ, ब आणि क फक्त
प्रश्न २. जोडय़ा जुळवा
अ. साम्राज्यवादी क वॉलेन्टाइन चिरोल विचारसरणी
ब. केंब्रिज विचारसरणी कक अनिल सेअल
क. राष्ट्रवादी विचारसरणी ककक आर. सी. मुझुमदार
ड. साम्यवादी विचारसरणी कश् आर. पी. दत्त
पर्यायी उत्तरे
१) अ- कक , ब- ककक, क- कश्, ड- क
२) अ- ककक, ब- कश्, क- क, ड- कक
३) अ- क, ब- कक, क- ककक, ड- कश्
४) अ- कश्, ब- क, क- कक, ड- ककक
प्रश्न ३. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली?
अ. काशिनाथ छत्रे
ब. जगन्नाथशास्त्री क्रमवंत
क. हरी केशवजी
ड. कॅ प्टन जॉर्ज जíव्हस
पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब फक्त
२) ब आणि ड फक्त
३) अ आणि क फक्त
४) अ, ब, क आणि ड
प्रश्न ४. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?
१) अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्त्वे दिसत नाहीत.
२) १७६५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली.
३) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी २२ मार्च १७९३ रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धती लागू केल्याची घोषणा केली.
४) प्रिंगेलची पुणे जिल्ह्य़ात सन १८२३ साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली.
प्रश्न ५. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना ———- आणि ——— यांच्या प्रयत्नांनी झाली.
१) माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार
२) दामोदर भिडे आणि दामोदर जोशी
३) हणमंत कुलकर्णी आणि माधवराव देशपांडे
४) खंडेराव बागल आणि दामोदर जोशी
प्रश्न ६. सन १९११ मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी ——– यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले.
१) भास्करराव जाधव
२) अण्णासाहेब लठ्ठे
३) हरीभाऊ चव्हाण
४) म. ग. डोंगरे
प्रश्न ७. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला?
१) इंडियन कौन्सिल अॅक्ट १९०९
२) इंडियन कौन्सिल अॅक्ट १८६१
३) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट १८५८
४) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट १९३५
या प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे लक्षात घ्यायचे मुद्दे पुढीलप्रमाणे –
ब्रिटिशांच्या साम्राज्यविस्तारापासून स्वातंत्र्योत्तर कालखंडातील सहकार चळवळीची प्रगती व महाराष्ट्राची स्थापना या टप्प्यापर्यंत प्रश्न विचारण्यात आले आहेत.
सामाजिक – राजकीय – आर्थिक अशा क्रमाने इतिहासाच्या पलूंना महत्त्व दिलेले दिसून येते. सामाजिक इतिहासावर सर्वाधिक प्रश्न विचारलेले दिसून येतात. समाजसुधारक तसेच राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत व्यक्तींबाबतची नेमकी माहिती विचारण्यावर सर्वाधिक भर असल्याचे लक्षात येते.
सामाजिक इतिहासावरील प्रश्न वृत्तपत्रे, लेखन, पुरस्कार, प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांची व्यक्तिगत माहिती, सामाजिक संस्था, संघटना या मुद्दय़ांवर भर देऊन विचारण्यात आले आहेत.
राजकीय इतिहासामध्ये प्रत्यक्ष स्वातंत्र्यलढय़ासहित ब्रिटिश नीती, धोरणे, कायदे, समांतर चळवळी/लढे आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडावरही तेवढेच महत्त्व देऊन प्रश्न विचारलेले दिसतात.
बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण खूप कमी आहे, पण सरळसोट व कमी पर्यायांचे प्रश्नही अवांतर व एकापेक्षा जास्त संदर्भग्रंथ अभ्यासले असतील तरच सोडविता येतील अशा काठिण्य पातळीचे आहेत.
सर्वसाधारणपणे माहीत असलेल्या मुद्दय़ांवर नेमकी, पण अपरिचित बाब विचारली जाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त संदर्भग्रंथ वाचणे सामाजिक इतिहास घटकासाठी तरी अत्यंत महत्त्वाचे आहे.