|| फारुक नाईकवाडे

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
Letter from Amolakchand college professor to district election decision officer regarding ballot paper voting
‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान घेतल्यास निवडणूक ड्युटी करतो! प्राध्यापकाच्या व्हायरल पत्राची समाजमाध्यमांमध्ये चर्चा 

राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा

राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेतील भाषा विषयांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

तांत्रिक क्षेत्रातील पदवीचे माध्यम बहुतांश वेळा इंग्रजी असते, त्यामुळे मराठी भाषेशी संपर्क कमी झालेला असतो आणि इंग्रजी भाषाही तांत्रिक परिभाषेपुरतीच मर्यादित झालेली असते. त्यामुळे या परीक्षेची पहिल्यांदाच तयारी करणा-या उमेदवारांसाठी भाषा विषयांची तयारी करताना थोडे जास्त प्रयत्न करावे लागू शकतात. शब्दसंग्रह, व्याकरण, आकलन या घटकांसाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. मात्र प्रश्नसंख्या आणि गुणांचे प्रमाण बदलले तरी तिन्ही सेवांसाठीच्या पूर्वपरीक्षांमध्ये मराठी व इंग्रजी भाषा घटक समाविष्ट होते आणि त्यांचा अभ्यासक्रमही सारखाच असल्याने आधीपासून तयारी करणाऱ्या उमेदवारांना काही वेगळी तयारी करावी लागणार नाही.

मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा अभ्यासक्रम एकसारखाच असल्याने त्यांच्या तयारीबाबत या लेखामध्ये एकत्रित चर्चा करण्यात येत आहे. तिन्ही सेवांच्या मागील प्रश्नपत्रिकांची उजळणी आणि विश्लेषण केल्यास आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा अभ्यास शक्य होईल. शक्यतो सरळसोट आणि सोपे प्रश्न विचारण्याकडे आयोगाचा कल असलेला दिसून येतो. अभ्यासक्रमाचे ढोबळमानाने पुढील चार विभाग विचारात घेऊन तयारी करता येईल: शब्दसंग्रह, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार आणि उताऱ्यांचे आकलन.

शब्दसंग्रह

समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठीचा शब्द हा भाग ‘आकलना’मध्ये समाविष्ट होतो. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरुन लक्षात येते की, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधील शब्दसंग्रहावरील प्रश्न हे अगदीच शालेय पातळीवरचे नाहीत; पण रोजचे काही ना काही वाचन असलेल्या उमेदवारांना त्यांचे संदर्भ सहजपणे लागतील अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे चालू घडामोडींसाठी वृत्तपत्र वाचन करताना त्याचाच भाषिक तयारीसाठी वापर करणे हा वेळेची बचत करणारा स्मार्ट उपाय आहे.

समानार्थी/विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. मराठीतील शब्दांच्या -हस्व-दीर्घ  वेलांटी/उकारांमधील बदलामुळे तसेच काना/मात्रा/वेलांटीची जागा बदलल्याने शब्दांचे अर्थ बदलतात हे लक्षात ठेवायला हवे. उदा. पाणि (हात)- पाणी (जल). इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराच्या किंवा स्पेलिंगच्या पण वेगळे अर्थ असणाऱ्या शब्दांच्या बाबतीत किंवा एकसारखा उच्चार पण स्पेलिंगमध्ये थोडय़ाशा बदलामुळे अर्थ बदलतो अशा शब्दांच्या बाबतीत नेमका अर्थ माहीत असणे आवश्यक ठरते. उदा  conform आणि  confirm या शब्दांमध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे प्रश्नातील व पर्यायातील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

म्हणी व वाक्प्रचार

म्हणी व वाक्प्रचार यावरील प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन हा उत्तम उपाय आहे. तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे शक्य नसेल तर म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन किंवा बाजारात उपलब्ध पुस्तक वापरावे. त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यायला हवा. अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणांमध्ये वापर करणे सोपे होते.

व्याकरण

मराठीतील विभक्ती प्रत्ययांचे कोष्टक आणि इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचे कोष्टक पाठच असायला हवेत.

मराठीतील व्याकरण या व्याख्येत जे येते त्या संधी, समास, अलंकार, शब्दांचे प्रकार, काळ, वाक्य पृथ:करण अशा बाबींचा अभ्यासक्रमामध्ये स्वतंत्र उल्लेख केलेला नाही आणि त्यांवर स्वतंत्रपणे प्रश्न विचारण्यास वावही कमी असला तरी वाक्यरचना, वाक्यपृथ:करण या बाबी व्यवस्थित तयार करायला हव्यात.  अन्य मुद्दय़ांबाबत नियम व्यवस्थित  समजून घेणे आणि त्यांचा काही  उदाहरणांमध्ये वापर करून पाहणे पुरेसे  आहे.

इंग्रजीतील वाक्य रूपांतरणाचे प्रश्न वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर नक्कीच सोडवता येतात. शब्दांचा वापर, काळ, प्रयोग, degrees of comparison  याबाबतचे नियम तयार करण्यासाठी उदाहरणांमध्ये वापर करायचा सराव करणे परिणामकारक ठरते.

उताऱ्यांचे आकलन

दोन्ही भाषांमध्ये प्रत्येकी किमान ५ गुणांसाठीचे प्रश्न उताऱ्यांवर आधारित असू शकतील. हे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्या:

मराठी उतारा साधारणपणे २५० ते ३०० शब्दांचा, तर इंग्रजी उतारा साधारण २०० शब्दांचा असू शकेल.

उपलब्ध वेळ आणि उताऱ्याची लांबी, काठिण्य पातळी यांचा विचार करता वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरते.

उताऱ्याला शीर्षक देणे, उताऱ्यामध्ये स्पष्टपणे सापडतील अशा मुद्दय़ा/ वाक्यांवर आधारित असेच प्रश्न विचारलेले असतील तर वेळ वाचवण्यासाठी आधी प्रश्न पाहून मग उतारा वाचावा. वाचनावेळी प्रश्नाशी संबंधित वाक्ये अधोरेखित करता येतील, जेणेकरून प्रश्न सोडविताना संबंधित वाक्य पटकन सापडेल.

इंग्रजीच्या तयारीसाठी रोजचे पेपरवाचन किंवा इतर कोणतेही इंग्रजी वाचन (व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवरील पोस्ट्स बिलकूल नाही) उपयोगी ठरेल.

मराठी वाचनाची सवय कमी झाली

असेल तर वाचनाचा वेग कमी होऊन

उत्तरे शोधायला जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे परीक्षा द्यायचा निर्णय घेतल्यापासून रोज मराठी वाचनाचा सराव सुरू करणे आवश्यक आहे.