श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये आपण आधुनिक भारताच्या १८५७ ते १९४७ पर्यंतच्या कालखंडाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत. आधुनिक भारताच्या या कालखंडावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात

article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास (भाग ३)
Pm narendra modi salary
पंतप्रधान मोदींचे दरमहा वेतन किती? कोणत्या जागतिक नेत्याचे वेतन सर्वाधिक?
A record of winning more than 400 seats in the Lok Sabha In the name of Rajiv Gandhi himself
‘४०० पार’नंतरची कारकीर्द…
mpsc Mantra Maharashtra Civil Services Gazetted Pre Exam History
mpsc मंत्र: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा: इतिहास
career
upsc ची तयारी: आधुनिक भारताचा इतिहास- भाग २
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास (भाग १)
agnibaan launching
‘अग्निबाण’ची झेप यशस्वी; रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण भारतासाठी किती महत्त्वाचे?
Kartarpur Sahib gurdwara PM Modi statement to take Kartarpur Sahib back
“‘कर्तारपूर’ १९७१ मध्येच भारतात आला असता”; मोदींच्या दाव्यातील गुरुद्वाराचा काय आहे इतिहास?
  • २०२१ मधील प्रश्न

मवाळवादी गटाने स्वातंत्र्य आंदोलनासाठी किती व्यापक आधार तयार केलेला होता? टिप्पणी करा. हा प्रश्न समजून घेताना मवाळवादी गटाचे कार्य कोणत्या उद्देशाने सुरू होते आणि यामुळे स्वातंत्र्य आंदोलनासाठी त्यांनी आधार कशाप्रकारे तयार केला याआधारे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळ यादरम्यान महात्मा गांधीजींचे रचनात्मक कार्यक्रम स्पष्ट करा. हा प्रश्न समजून घेताना महात्मा गांधीजींचे तत्त्व काय होते तसेच या तत्त्वांवर आधारित रचनात्मक कार्यक्रम त्यांनी अवलंबिलेले होते. या दोन्ही चळवळीची उद्दिष्टे एकप्रकारे महात्मा गांधीजींचे रचनात्मक कार्यक्रम अधोरेखित करतात, इत्यादी उत्तरात लिहिणे आवश्यक आहे.

  • २०१३-२० मधील प्रश्न

गतवर्षीय परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न

१९२०च्या दशकातील राष्ट्रीय चळवळीने अनेक विचारधारांचे अधिग्रहण करून स्वत:चा सामाजिक आधार विस्तारित केला. चर्चा करा. हा प्रश्न समजून घेताना गांधीजींची विचारधारा, समाजवादाची विचारधारा, क्रांतिकारी विचारधारा इ. विचारधारा माहिती असणे गरजेचे आहे आणि याद्वारे राष्ट्रीय चळवळीने स्वत:चा विस्तार कसा केला याची उदाहरणासह चर्चा करणे येथे अपेक्षित आहे. १९४०च्या दशकादरम्यान सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया गुंतागुंतीची बनवण्यामागील ब्रिटिश साम्राज्य सत्तेच्या भूमिकेचे मूल्यांकन करा.

या प्रश्नाचे आकलन करताना दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे निर्माण झालेली स्थिती आणि तत्कालीन भारतीय चळवळीतील भारतीय नेत्यांच्या मागण्या याविषयीची समज असणे गरजेचे आहे. या मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ब्रिटिशांनी केलेल्या उपाययोजना आणि या उपाययोजनांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया कशी गुंतागुंतीची बनविलेली होती हे सोदाहरण स्पष्ट करून ब्रिटिश साम्राज्य सत्तेच्या भूमिकेचे मूल्यांकन करावे लागते. स्वतंत्र भारतासाठी संविधानाचा मसुदा फक्त तीन वर्षांमध्ये तयार करण्याचे ऐतिहासिक कार्य संविधान सभेला पूर्ण करणे कठीण गेले असते, पण १९३५ च्या भारत सरकारच्या कायद्याचा अनुभवामुळे करता आले. चर्चा करा.

हा प्रश्न समजून घेताना ब्रिटिश शासन काळात संविधान निर्मितीला चालना देणारे कायदे समजून घेणे गरजेचे आहे. ते कशाप्रकारे १९३५ चा भारत सरकार कायदा याची पार्श्वभूमी तयार करणारे होते, हे सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे आहे. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना १९३५चा भारत सरकार कायदा आणि यातील तरतुदी याचा प्रामुख्याने स्वतंत्र भारताचे संविधान तयार करताना संविधान सभेने विचार केलेला होता. यातील अनेक तरतुदींचा संविधानामध्ये समावेश केलेला होता, हे थोडक्यात नमूद करून १९३५ चा भारत सरकार कायदा हा संविधान सभेला स्वतंत्र भारताचे संविधान तीन वर्षांमध्ये तयार करण्यासाठी कशाप्रकारे उपयुक्त ठरला, हे दाखवून चर्चा करणे अपेक्षित आहे. ‘सद्यस्थितीमध्ये महात्मा गांधींजीच्या विचारांचे महत्त्व’ यावर प्रकाश टाका.

या प्रश्नाचे उत्तर लिहिताना महात्मा गांधींजीची विचारधारा थोडक्यात नमूद करून, सद्यस्थितीमध्ये घडणाऱ्या घडामोडींची पार्श्वभूमी देऊन ही विचारधारा कशी महत्त्वाची आहे, हे अधोरेखित करून दाखवावे लागते. जगामध्ये घडलेल्या कोणत्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींनी भारतातील वसाहतविरोधी संघर्षांला प्रेरणा दिलेली होती ?

हा प्रश्न व्यवस्थित समजून घेण्यासाठी १८व्या, १९व्या आणि २०व्या शतकातील अनुक्रमे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, १९व्या शतकातील युरोपमधील क्रांती तसेच जर्मनी आणि इटली या राष्ट्राचा उदय आणि जपानचा आधुनिक राष्ट्र म्हणून झालेला उदय आणि युरोपमधील प्रबोधनामुळे अस्तित्वात आलेली उदारमतवाद आणि साम्यवाद ही आधुनिक विचारधारा तसेच व रशियन राज्यक्रांती इत्यादी महत्वपूर्ण घडामोडींचा विचार करून यातून भारतातील वसाहतविरोधी संघर्षांला कशी प्रेरणा मिळाली याचे विश्लेषण करणे अभिप्रेत आहे.

आधुनिक भारतात महिलासंबंधी असणारे प्रश्न १९व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीचा भाग म्हणून उठविण्यात आलेले होते. त्या काळात महिलासंबंधी कोणते मुख्य मुद्दे आणि वादविवाद होते? हा प्रश्न समजून घेताना सर्वप्रथम १९व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळ काय होती, हे माहिती असणे गरजेचे आहे. १९व्या शतकातील सामाजिक सुधारणांचा गाभा हा भारतीय समाजात असणारी अंधश्रद्धा आणि महिलासंबंधी असणारे सामाजिक प्रश्न ज्यामध्ये महिलावर असणारी पारंपरिक बंधने, शिक्षणाचा अभाव, सती प्रथा, विधवा महिलांसंबंधी असणारे प्रश्न इत्यादींचा समावेश होता. तसेच याच्याशी संबंधित वादविवाद ही भारतीय समाजात चालू होते, हे सोदाहरण उत्तरात नमूद करून चर्चा करणे येथे अपेक्षित आहे.

या घटकाची मूलभूत माहिती आपल्याला एनसीईआरटीच्या आधुनिक भारताशी संबंधित पुस्तकांमधून मिळते आणि या विषयाची सर्वागीण आणि सखोल तयारी करण्यासाठी ग्रोवर आणि ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’, बिपिन चंद्र लिखित ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडीपेंडस’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टिशन’ यांसारख्या संदर्भ ग्रंथांचा उपयोग होतो.