रोहिणी शहा

राजपत्रित तांत्रिक सेवांच्या संयुक्त पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आणि पूर्वीच्या अभ्यासक्रमाच्या विश्लेषणाच्या आधारे, अभ्यासक्रमामध्ये झालेले बदल कोणते आहेत याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. सामान्य बौद्धिक क्षमता हा घटक कृषि सेवा आणि अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेमध्ये यापूर्वी समाविष्ट नव्हता. मात्र संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये हा घटक समाविष्ट आहे. त्यामुळे या परीक्षांची तयारी करणा-या उमेदवारांना या घटकाची नव्याने तयारी करावी लागणार आहे. अभ्यासक्रमाचा विस्तार पाहता या घटकावर किमान १५ ते कमाल २५ प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तयारी करण्यापूर्वी या घटकाच्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्यांचे प्रकार समजून घेणे आवश्यक आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून या घटकावर विविध परीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे सर्वसाधारण स्वरूप कसे आहे याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

सामान्य बौद्धिक क्षमता घटकामधील वैविध्यामुळे आणि काही प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ पाहता हा घटक काही अंशी आव्हानात्मक वाटतो. पण प्रश्न सोडविण्याचा सराव करत राहिल्यास ते सोडविण्यासाठीची सूत्रे, युक्त्या-प्रयुक्त्या समजतात आणि आत्मविश्वास वाढतो. आयोगाच्या विविध परीक्षांच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहिले तर या भागामध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे सर्वसाधारण प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:

  •    अंकगणित

संख्यामालिका

यामध्ये एखादी संख्या आधाराशी घेऊन तिच्यावर ठरावीक गणिती सूत्रे किंवा प्रक्रिया वापरून पुढील संख्या काढली जाते. त्याच प्रक्रियेने त्यापुढील संख्या अशा प्रकारे तयार केलेल्या मालिकेतील गहाळ किंवा चुकीची संख्या शोधायची असते. किंवा दिलेल्या संख्या या ठराविक गणिती प्रक्रियेचे मूल्य असलेल्या असतात. उदा. क्रमाने मूळ संख्यांचे वर्ग अथवा घन अधिक / उणे ठराविक संख्या

काळ – काम / अंतर – वेग

मजुरांच्या कामाचे वेग आणि होणारे काम किंवा गाडी / ट्रेनच्या वेगावरून कापलेले अंतर यावर आधारित प्रश्न असतात. यामध्ये वेगवेगळय़ा घटकांच्या वेगाची कॉम्बिनेशन्स वापरून काठिण्य पातळी वाढविण्यात येते.

गुणोत्तर व प्रमाण, टक्केवारी व भागीदारी (नफा तोटा)

मिश्रणांमधील घटकांचे गुणोत्तर किंवा टक्केवारी देऊन त्यावर ठरावीक प्रक्रिया केल्यास तयार होणारे नवीन प्रमाण शोधणे, वेगवेगळय़ा वेळी भागीदारी स्वीकारणारे भागीदार व त्यांच्या भांडवलांचे एकमेकांशी असलेले प्रमाण देऊन अंतिम नफा तोटा मोजणे अशा प्रकारचे प्रश्न.

त्रिकोणमिती, क्षेत्रमिती

त्रिकोणमिती व क्षेत्रमितीच्या सूत्रांच्या आधारे कमी जास्त होणारे क्षेत्रफळ किंवा त्याच्या देखभाल दुरुस्ती / रंगरंगोटीचा खर्च अशा प्रकारचे उपयोजित प्रश्न तसेच त्रिकोणमितीच्या आधारे दिशाज्ञानाचे प्रश्न.

आकृतीमधील गणिती प्रक्रिया

एकाच आकृतीमध्ये समाविष्ट संख्यांमधील संबंध समजून घेऊन गहाळ संख्या शोधणे: एका आकृतीमधील संख्यांचा संबंध समजून घेऊन दुसऱ्या आकृतीमधील संख्या शोधणे.

  •     तर्कक्षमता

विधानांवर आधारीत निष्कर्ष पद्धती

( Syllogism)

सर्वसाधारणपणे अवास्तव वाटणारी काही विधाने देऊन त्यांच्या आधारे काढण्यात आलेल्या निष्कर्षांची योग्यायोग्यता तपासायची असते.

सहसंबंध

दिलेल्या पदांमधील / आकृत्यांमधील सहसंबंध ओळखून पुढील पद शोधणे.

नातेसंबंध

दिलेल्या वर्णनावरून गटातील व्यक्तींचे नातेसंबंध प्रस्थापित करून प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. मागील काही वर्षांपासून दिलेली नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी पर्याप्त आहे किंवा कसे अशा प्रकारचे प्रश्नही विचारण्यात आले आहेत.

बैठक व्यवस्था

एका सरळ रेषेत किंवा वर्तुळाकार बसलेल्या व्यक्तींचा क्रम शोधणे.

दिशा, घडय़ाळ व कॅलेंडर

  •     बुद्धिमत्ता चाचणी व्यक्तीच्या माहितीचे संयोजन

गटातील व्यक्तीचे छंद / व्यवसाय शिक्षण वय खेळ रहिवासाची ठिकाणे यांची कॉम्बिनेशन्स देऊन ठरावीक व्यक्तीशी संबंधित माहिती विचारण्यात येते.

सांकेतिक भाषा

संकेत, अंकाक्षर, सांकेतिक भाषा यावरील प्रश्नांचे दोन ठळक प्रकार पडतात. शब्द किंवा अक्षरांना संकेत देऊन तयार केलेली वाक्ये किंवा पदे देण्यात येतात आणि त्या नियमांच्या आधारे एखाद्या शब्द / अक्षराचा संकेत शोधणे हा एक प्रकार, तर गटातील अक्षरांना संकेत देऊन त्याखाली दिलेल्या नियमांच्या आधारे तयार होणाऱ्या सांकेतिक पदांवर प्रश्न विचारण्यात येतात.

  •     ठोकळे इनपुट आउटपुट काउंटिंग

शब्द किंवा संख्या यांच्या क्रमामध्ये होणाऱ्या बदलांचे नियम समजून घेऊन त्या आधारे दुसऱ्या गटातील शब्द किंवा संख्यांच्या संयोजनावर आधारित प्रश्न.

आकृतिमालिका, आकृत्यांवर आधारित प्रश्न

आकृतीमध्ये समाविष्ट तुकडे किंवा तुकडय़ांनी तयार होणारी आकृती; कागदाला घडी घालून छिद्र केल्यास तयार होणारी अंतिम आकृती, पारदर्शक कागदाच्या घडीनंतर दिसणारी आकृती, एका आकृतीवर प्रक्रिया केल्यानंतर मिळणाऱ्या आकृतीबाबतचे नियम समजून घेऊन अशा प्रक्रियांच्या संयोजनावरील प्रश्न, ठरावीक नियमांनी बनलेल्या आकृत्यांच्या मालिकेतील गहाळ किंवा चुकीची आकृती शोधणे.

  •     वर्णाक्षर मालिका डेटा सफिशिएन्सी.

माहितीचे अर्थातरण, सांकेतिक माहितीच्या आधारावर माहितीचे अर्थातरण दिलेल्या माहितीमधील कोणती माहिती एखादे विधान सिद्ध करण्यास आवश्यक किंवा पुरेशी आहे हे शोधणे; दिलेल्या संकेतांच्या आधारे माहितीवर प्रक्रिया करून उत्तर शोधणे अशा प्रकारचे प्रश्न.