Maharashtra Jobs: सरकारी नोकरीची संधी! ८०० पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या अधिक तपशील

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२२ आहे.

govt job 2022
नोकरीची संधी (फोटो: Pixabay )

MPSC Subordinate Services Pre Exam 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC ) ने सहाय्यक विभाग अधिकारी, सब रजिस्टर, राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या पदांसाठी एमपीएससी दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०२२ च्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://mpsc.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एमपीएससी भरती मंडळ, महाराष्ट्र द्वारे जून २०२२ च्या जाहिरातीत एकूण ८०० रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२२ आहे.

पदाचे नाव

सहाय्यक कक्ष अधिकारी गट-बी, राज्य कर निरीक्षक गट-बी, पोलिस उपनिरीक्षक गट-बी, दुय्यम रजिस्ट्रार/मुद्रांक निरीक्षक:- पोलिस उपनिरीक्षक गट-बी.

(हे ही वाचा: दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी! टपाल जीवन विमा मध्ये विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखत)

रिक्त पदे

८०० पदे – (१) सहायक सेल अधिकारी :- ४२ पदे, (२) राज्य कर निरीक्षक :- ७७ पदे, (३) पोलीस उपनिरीक्षक:-६०३ पदे, (४) दुय्यम रजिस्ट्रार/ मुद्रांक निरीक्षक:- ७८ पोस्ट

शैक्षणिक पात्रता

उमेदवार पदवी धारक असणे आवश्यक.

(हे ही वाचा: Jobs 2022: नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चरमध्ये भरती; अर्जप्रक्रिया सुरु)

नोकरी ठिकाण

नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असेल.

शुल्क

अमागास श्रेणी – रु. ३९४/- तर मगसवर्गीय आणि अनाथ श्रेणी – रु. २९४/- असे अर्ज शुल्क आकारण्यात आले आहे.

(हे ही वाचा: IAF Agneepath Recruitment 2022: अधिसूचना जारी; २४ जूनपासून भरतीप्रक्रिया सुरु; जाणून घ्या अधिक तपशील)

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्याची पध्दत ऑनलाइन आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

लक्षात घ्या अर्ज करायची शेवटची तारीख १५ जुलै २०२२ आहे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mpsc recruitment 2022 non gazetted officer posts vacant in maharashtra government job ttg

Next Story
दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी! टपाल जीवन विमा मध्ये विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी