महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला ऑनलाइन सेवा पुरवणारी वेबसाईट डाऊन (Online application process for MPSC stopped) असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून समोर येत होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढही दिली. मात्र रविवारी मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा एकदा ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या.

एमपीएससीसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांना (MPSC Recruitment) तांत्रिक अडचणी म्हणजेच टेक्निकल फॉल्टमुळे अनेकांना अर्ज भरता येत नव्हता. वेळेत अर्ज कसा भरावा असा प्रश्न विद्यार्थ्यासमोर निर्माण झालेला असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दिलासा देणारा एक निर्णय घेतलाय. आयोगाने जाहीर केलेल्या सर्व जाहिरातींनुसार सुरु असणारी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित केलीय.

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
MPSC Announces General Merit List, Police Sub Inspector Cadre , Relief to Candidates, mpsc announced merit list, mpsc, maharashtra news, government exam, police, police officer, marathi news, students, MPSC
एमपीएससीकडून २०२१च्या ‘पीएसआय’ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर

ऑनलाइन अर्ज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची दखल घेत आयोगाने संपूर्ण प्रक्रियाच स्थगित केलीय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली. संबंधित वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतरच पुन्हा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी योग्य ती मुदतवाढ देण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं स्पष्ट केलंय. “प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल,” असं ट्विट करण्यात आलंय.

रविवारी दुपारी महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षेचे अर्ज करताना अनेकदा तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. अशाप्रकारच्या अनेक तक्रारी आल्यानंतर लोकसेवा आयोगानं प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातीनुसार अर्ज भरण्याची प्रक्रियाच स्थगित करत असल्याची घोषणा केली. तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर पुन्हा सूचना करण्यात येईल आणि सर्व जाहिरातींनुसार अनुसरुन अर्जदारांना पुरेशी मुदत देण्यात येईल असं आयोगानं म्हटलंय.

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ (जाहिरात क्रमांक २६९/२०२१) तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ (जाहिरात क्रमांक २७०/२०२१) साठी १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता अर्ज करण्यासाठी स्थगिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय.