MAVIM Nagpur Recruitment 2021: ‘या’ पदासाठी होणार भरती; जाणून घ्या अधिक तपशील

पात्र उमेदवार या पदासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीनं अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

MAVIM Nagpur Recruitment 2021
महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर येथे नोकरीची संधी (प्रातिनिधिक फोटो)
महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर (Mahila Arthik Vikas Mahamandal Nagpur) यांनी रिक्त पदांसाठी भरती करण्यासाठी या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. व्यवसाय विकास सल्लागार या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवार या पदासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीनं अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

जाणून घ्या संस्थेबद्दल

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्‍ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे. आंतरराष्‍ट्रीय महिला वर्षाच्‍या निमित्‍ताने २४ फेब्रुवारी १९७५ साली या महामंडळाची स्‍थापना झाली. महिलांच्‍या सर्वांगीण विकासाचे महत्त्‍व व महामंडळाची या कामातील तज्ञता ध्‍यानी घेऊन महाराष्‍ट्र शासनाने शासन निर्णय क्र.माविम-२००१ /प्र.क्र.१०, दि. २० जानेवारी २००३ नुसार महामंडळाला महिला विकासाची राज्‍यस्‍तरीय ”शिखर संस्‍था” म्‍हणून घोषित केले आहे.

या पदासाठी भरती होणार

व्यवसाय विकास सल्लागार (Business Development Consultant)- १ पद

पात्रता काय? आणि अनुभव किती हवा?

व्यवसाय विकास सल्लागार (Business Development Consultant) या पदासाठी पात्र उमेदवाराचं MBA मार्केटिंगपर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अध्यक्षा, आस्था लोक संचालित साधन केंद्र, व्दारा- महिला आर्थिक विकास महामंडळ, “माविम महिला प्रांगण”, प्लॉट नं. पी- ६२, आर आणि सी झोन, MIDC, बुटीबोरी नागपूर – ४४११२२
किंवा https://www.mavimindia.org/ वरती जाऊनही पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२१ आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार संस्थेची अधिकृत वेबसाईट पाहू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nagpur job latest job updates 2021 bumper vacancy for posts mavim nagpur recruitment 2021 direct apply online last day 13 september ttg