Job Alert: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथे ‘या’ २७ रिक्त पदांसाठी करा अर्ज; जाणून घ्या अधिक तपशील

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२१ असणार आहे.

National Chemical Laboratory Pune
पुणे जॉब ऑफर (फोटो: csir.res.in)

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (CSIR-NCL) पुणे इथे कनिष्ठ सचिव सहाय्यक (सामान्य) , कनिष्ठ आशुलिपिक, चालक या पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ३० ऑगस्टपासून सुरू झाली आहे आणि ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. अर्जाच्या हार्ड कॉपीसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर आहे.

CSIR-NCL भरती रिक्त जागा तपशील-

ही भरती मोहीम २७ रिक्त जागा भरण्यासाठी आयोजित केली जात आहे. त्यापैकी कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (सामान्य), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (स्टोअर आणि खरेदी) आणि ड्रायव्हर या पदांसाठी प्रत्येकी सहा रिक्त जागा आहेत. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (वित्त आणि लेखा) या पदासाठी चार रिक्त पदे आहेत आणि कनिष्ठ आशुलिपिक पदासाठी पाच रिक्त जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ सचिव सहाय्यक (Jr. Secretary Assistant) या पदासाठी संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक आहे. कनिष्ठ आशुलिपिक (Jr. Stenographer) या पदासाठी संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक आहे आणि चालक (Driver) या पदासाठी संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक आहे.

भरतीसाठी वयोमर्यादा

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (सामान्य), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (स्टोअर आणि खरेदी) आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (वित्त आणि लेखा) साठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे आहे. कनिष्ठ आशुलिपिक आणि चालक पदासाठी वयोमर्यादा २७ वर्षे आहे.

पगार किती?

कनिष्ठ सचिव सहाय्यक (Jr. Secretary Assistant) – १९,९०० – ६३,२०० रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ आशुलिपिक (Jr. Stenographer) – २५,५०० – ८१,१०० रुपये प्रतिमहिना
चालक (Driver) – १९,९०० – ६३,२०० रुपये प्रतिमहिना

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवार कोणत्याही तांत्रिक मदतीसाठी किंवा प्रश्नांसाठी recruitment@ncl.rec.in वर मेल करू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: National chemical laboratory pune job alert bumper opening for post of csir apply online before 30 september ttg