देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या : जागतिक बँकेची आर्थिक पदव्युत्तर शिष्यवृत्ती

जागतिक बँकेकडून सदस्य असलेल्या विकसनशील राष्ट्रांमधील अर्जदारांना वेगळ्या विषयांवरील अभ्यासक्रम अथवा प्रकल्पांसाठी शिष्यवृत्त्या दिल्या जातात. जागतिक बँक जवळपास या सर्वच शिष्यवृत्त्या एखाद्या इतर सहकारी देशाच्या मदतीने देत असते.

जागतिक बँकेकडून सदस्य असलेल्या विकसनशील राष्ट्रांमधील अर्जदारांना वेगळ्या विषयांवरील अभ्यासक्रम अथवा प्रकल्पांसाठी शिष्यवृत्त्या दिल्या जातात. जागतिक बँक जवळपास या सर्वच शिष्यवृत्त्या एखाद्या इतर सहकारी देशाच्या मदतीने देत असते. त्यातील एक महत्त्वाची शिष्यवृत्ती म्हणजे जपान-जागतिक बँक संयुक्त शिष्यवृत्ती (Joint Japan/World Bank Graduate Scholarship – JJWBGS ). शिष्यवृत्तीच्या नावावरूनच लक्षात येईल की, ती जपानच्या सहकार्याने दिली जाते. जागतिक बँकेची ही शिष्यवृत्ती आíथक विकासाशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही या शिष्यवृत्तीसाठी ३१ मार्चपूर्वी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पाश्र्वभूमी – जागतिक बँकेच्या सदस्य देशांची संख्या साधारणत: १५० पेक्षाही जास्त आहे. जगातील सर्व विकसनशील देशांमध्ये आíथक स्थर्य नांदावे म्हणून त्या देशांमधील आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यावरण विकासाशी संबंधित विषयांकडे जागतिक बँक विशेष लक्ष देत असते. विशेषत: यामुळेच अनेक विकसनशील देशांमध्ये जागतिक बँकेकडून बरेचसे कार्यक्रम राबवले जातात. या कार्यक्रमांतर्गत विकसनशील देशांत आíथक व सामाजिक विकासाच्या क्षेत्रात उच्च प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या साऱ्याचा जागतिक विकासास हातभार लावणे असा व्यापक व दीर्घकालीन हेतू जागतिक बँकेसमोर आहे. शिष्यवृत्तीधारकांनी शिष्यवृत्तीच्या कालावधीनंतर आपल्या ज्ञान व कौशल्याचा वापर करून स्वत:च्या देशातील आíथक-सामाजिक विकासासाठी योगदान द्यावे अशी या कार्यक्रमातून अपेक्षा आहे. अर्थातच, ती बंधनकारक नाही.
आवश्यक पात्रता – जागतिक बँकेच्या या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्जदार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे. मात्र, अर्जदाराचा जन्म ३१ मार्च १९७३ पूर्वी झालेला नसावा. त्याचबरोबर अर्जदाराकडे ३१ मार्च २०१३ पर्यंत स्वत:च्या देशात किंवा इतरत्र फक्त विकसनशील देशामध्ये कमीतकमी दोन वर्षांचा (जास्त अनुभवी अर्जदारांना प्राधान्य) कामाचा अनुभव असावा. अर्जदार कोणत्याही विकसित देशाचा नागरिक किंवा तेथील कायमचा रहिवासी नसावा. तसेच, अर्जदाराचा कोणत्याही विकसित देशातील निवासाचा कालावधी एक वर्षांपेक्षा जास्त नसावा. अर्जदार जागतिक बँक अथवा तिच्याशी संबंधित कोणत्याही संस्थेचा कर्मचारी नसावा. अर्जदाराचे चारित्र्य व त्याची शारीरिक स्थिती उत्तम असावी.
शिष्यवृत्तीबद्दल – १९८७ साली जागतिक बँकेने जपान सरकारकडून मिळालेल्या निधीतून त्याच वर्षांपासून ‘जागतिक बँक शिष्यवृत्ती कार्यक्रम’ राबवायला सुरुवात केली. या कार्यक्रमांतर्गत जागतिक बँकेचे सदस्य असलेल्या विकसनशील राष्ट्रांमधील विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. वर उल्लेखलेली शिष्यवृत्ती त्यांपकीच एक आहे. जगातल्या बऱ्याचशा विद्यापीठांत आज ‘आíथक विकासा’शी संबंधित अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ. अर्थशास्त्र, आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यावरण किंवा विकासाशी संबंधित इतर विषय. तर त्यापकी कोणत्याही एक किंवा दोन वर्षांच्या पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती मिळवता येते. फक्त तो अभ्यासक्रम उपलब्ध असलेले विद्यापीठ स्वत:च्या देशाऐवजी जागतिक बँकेचे सदस्य असलेल्या इतर कोणत्याही विकसनशील देशांमधील असावे. थोडक्यात, एखाद्या भारतीय विद्यार्थ्यांला जर ही
शिष्यवृत्ती मिळाली तर त्याला भारतातील कोणत्याही विद्यापीठात तत्सम अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार नाही. त्याऐवजी तो परदेशातील कोणत्याही विद्यापीठामध्ये उपरोक्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. आतापर्यंत साधारणत: ६४ हजार अर्जदारांमधून साडेतीन हजार अर्जदारांची अंतिम निवड या शिष्यवृत्तीसाठी करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जागतिक बँकेकडून पूर्णवेळ शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये विद्यापीठाची टय़ुशन फी, निवासासाहित इतर सर्व खर्च, अर्जदाराचे विमानाचे तिकीट व त्याचा वैद्यकीय व अपघात विमा या सर्व बाबींचा समावेश आहे. या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना अशा कोणत्याही अभ्यासक्रमासाठी परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाला असेल तर त्यांच्याकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवलेले आहेत.
अर्ज प्रक्रिया – जागतिक बँकेच्या वेबसाइटवर अर्जप्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज अजून वेबसाइटवर उपलब्ध नाहीत. मात्र येत्या काही दिवसांत ते उपलब्ध होतील असे नमूद केलेले आहे. अर्जासोबत अर्जदाराला त्याचे शिक्षण व शिक्षणेतर उपक्रम इत्यादी बाबींची माहिती देणारा सी. व्ही., परदेशी विद्यापीठाकडून मिळालेले प्रवेशपत्र, नोकरीच्या (किंवा व्यवसायाच्या) अनुभवाचे प्रशस्तीपत्र, दोन शैक्षणिक तज्ज्ञांचे शिफारसपत्र, आतापर्यंतची सर्व शैक्षणिक ट्रान्स्क्रिप्ट्स आणि राष्ट्रीयत्वाचा व जन्मतारखेचा पुरावा देणारी कागदपत्रे जोडावी लागतील.
अंतिम मुदत – अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१३ आहे. तर शिष्यवृत्तीबद्दल अर्जदारांना जुलच्या अखेरीस कळवले जाईल.
महत्त्वाचा दुवा – http://www.worldbank.org   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: National international scholarshipsworld bank economical post graduation scholarship

ताज्या बातम्या