राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण प्रतिष्ठान, नेवेली (तामिळनाडू) तर्फे घेण्यात येणाऱ्या ग्रॅज्युएट इंजिनीअर्स कोर्स (थर्मल) २०१४-२०१५ या विशेष अभ्यासक्रमासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विषयातील इंजिनीअरिंगची पदवी कमीतकमी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय २७ वर्षांहून अधिक असू नये.
उपलब्ध जागा व तपशील : या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ७७ असून त्यापैकी काही जागा राखीव आहेत.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना एनपीटीआयच्या नेवेली, नवी दिल्ली वा नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रात खास पदवीधर इंजिनीअर्ससाठी असणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २०१४-२०१५ या सत्रामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास ८०० रु.चा ‘एनपीटीआय’च्या नावे असणारा व नेवेली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह इन्स्टिटय़ूटच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क :
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एनपीटीआय-नेवेली येथे दूरध्वनी क्र. ०४१४२-२६९४२७ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nptineveli.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख :
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज दि डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट सदर्न रिजन, ब्लॉक १४, नेवेली ६०७८०३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१३.
ज्या पदवीधर इंजिनीअर विद्यार्थ्यांना थर्मल पॉवर या ऊर्जाविषयक क्षेत्रात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासह आपले करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा विचार करणे फायदेशीर ठरू शकते.