|| द. वा. आंबुलकर

नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, फरिदाबाद येथे उपलब्ध असणाऱ्या विविध पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

पॉवर प्लँट इंजिनीअरिंगमधील पदविका अभ्यासक्रम – अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर अ‍ॅण्ड इंस्ट्रमेंटेशन अथवा पॉवर इंजिनीअरिंगमधील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

स्मार्ट ग्रीड टेक्नॉलॉजीमधील पदविका अभ्यासक्रम – अर्जदारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, कॉम्प्युटर अ‍ॅण्ड इंस्ट्रमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, टेक्नॉलॉजी यांसारख्या विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

पॉवर सिस्टिम ऑपरेशनमधील पदविका अभ्यासक्रम- अर्जदारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन अथवा पॉवर इंजिनीअरिंगमधील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

एनर्जी मार्केट मॅनेजमेंटमधील पदविका अभ्यासक्रम- अर्जदारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन अथवा पॉवर इंजिनीअरिंगमधील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

रिन्युएबल एनर्जी अ‍ॅण्ड ग्रीड इंटरफेस टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम – अर्जदारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर अ‍ॅण्ड इंस्ट्रमेंटेशन अथवा पॉवर इंजिनीअरिंगमधील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

विशेष सूचना- अर्जदारांची वरील पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी कमीतकमी ६०% असायला हवी.

अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जदारांनी अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून २०० रु. संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी राष्ट्रीय स्तरावर निर्धारित परीक्षा केंद्रांवर २४ जून २०१८ रोजी घेण्यात येईल. व त्यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर शहराचा समावेश असेल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २५ मे २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, फरिदाबादची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या  http://npti.in/   या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २००८ आहे.