NEET UG Counselling 2021 : मेडिकल काउंसलिंग कमेटी म्हणजेच एमसीसीने आज १९ जानेवारीपासून नीट यूजी काउंसलिंगसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. जे उमेदवार या ऑनलाइन काउंसलिंग राऊंडसाठी अर्ज करू इच्छितात ते अधिकृत संकेतस्थळ mcc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

उमेदवार २४ जानेवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात. पर्याय निवडण्यासाठीची लिंक २० जानेवारीला सक्रिय होईल आणि २४ जानेवारीला ती निष्क्रिय केली जाईल. अर्ज केलेल्या उमेदवारांची २५ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत संबंधित विद्यापीठ/संस्थांकडून पडताळणी केली जाईल. २७ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत जागा वाटप प्रक्रिया पार पडेल. २९ जानेवारीला निकाल जाहीर केला जाईल आणि ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत अहवाल दिला जाईल.

What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
IB Recruitment 2024
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ६६० पदांसाठी भरती; अशा प्रकारे करता येणार अर्ज
how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या
NTPC Green Energy Limited NGEL Recruitment 2024 for 63 Engineer & Executive Posts
NGEL Recruitment 2024 : ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

नीट यूजी काउंसलिंगसाठी नोंदणी कशी करावी?

>> अधिकृत संकेतस्थळ mcc.nic.in ला भेट द्यावी.

>> नीट यूजी काउंसलिंग २०२१ वर क्लिक करावे.

>> लॉगिन डिटेल्सवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी आणि सबमिट करावे.

>> फॉर्म भरवून अर्ज फी जमा करावी.

>> अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यावी.

नीट यूजी काउंसलिंग २०२१ साठी आवश्यक कागदपत्रे

>> नीट प्रवेशपत्र (NEET Admit Card)

>> नीट युजी गुणपत्र (NEET UG scorecard)

>> जन्म तारखेसाठी दहावीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका (Class 10 certificate and mark sheet for date of birth)

>> बारावीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका (Class 12 certificate and mark sheet)

>> ओळखपत्र (ID proof – Aadhar/PAN Card/Driving License/Passport)

>> आठ पासपोर्ट आकाराचे फोटो (Eight passport size photographs)

>> प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर (Provisional Allotment Letter)

>> लागू असल्यास – जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
– पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र (PwD Certificate)