सायबर कायद्याचे नवे क्षेत्र – युवराज नरवणकर, कायदेतज्ज्ञ

सायबर कायदा ही एक संकल्पना आहे जी अनेक कायद्यांमध्ये विखुरली गेली आहे.

सायबर कायदा ही एक संकल्पना आहे जी अनेक कायद्यांमध्ये विखुरली गेली आहे. अनेकदा समाजमाध्यमांवर मनोरंजनात्मक आशय निर्माण केला जातो पण त्यातही कॉपीराइटसारखा मुद्दा उपस्थित होऊ शकतो आणि आधीच्या निर्मात्यांची नक्कल (कॉपी) केली म्हणून त्यावर गुन्हाही होऊ शकतो. संगणकावरील कंपनीचा डेटा जर बाहेर वापरला तर डेटा लिकच्या आधारे तो गुन्हा होतो. त्यामुळे तीन वर्षांची सक्तमजुरी आणि पाच लाखांपर्यंतचा दंड होतो. तेव्हा अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला असल्याने सायबर कायद्याकडे दैनंदिन जीवनातील सुरक्षा म्हणून पाहणे आवश्यक आहे. डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर, सर्टिफिकेट आणि डॉक्टरेट असे पाच दरवाजे सायबर कायद्यात करिअर करण्यासाठी खुले आहेत.

सीए, मेडिकल, आभियांत्रिकी अशा कुठल्याही क्षेत्रातील पदवी असेल तर तुम्ही डिप्लोमा करू शकता. यासाठी बंगलोरची नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, गव्हर्मेट लॉ कॉलेज, चर्चगेट तसेच आयएमएस अशी सायबर कायदा शिकण्यासाठीची अनेक विद्यापीठे आहेत. बहुतेक विद्यापीठे आता सायबर कायदा शिकवण्यासाठी स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम देतात. वीस टक्के संगणक आणि ऐंशी टक्के कायदा या गोष्टी सायबर कायद्यात महत्त्वाच्या असतात. संगणक आवडतो, म्हणून त्यात करिअर करायचे असेल तर सायबर फॉरेन्सिक्समध्येही संधी आहेत. बीटेक एलएल.बी. म्हणून अभ्यासक्रम युपीईएस, देहरादून येथे आणि मॅक्स युनिव्हर्सिटी, रायपूर येथे जाऊन तुम्ही करू शकता. त्याशिवाय इन्टेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक मालमत्ता या क्षेत्रातही मोठे करिअर आहे.

नाल्सार आणि एनएलएस या भारतातील उत्तम शिक्षण संस्था आहेत. क्लॅट परीक्षा देऊन येथे प्रवेश घेता येऊ शकतो. या शिक्षणातून सायबर कायद्यात काम करणाऱ्या वकिलाकडे इंटनर्शिप करता येते त्याशिवाय लिटिगेशन आणि नॉन लिटिगेशन असेही भाग या क्षेत्रात आहेत. शिवाय आयटी कंपनीतही कन्सल्टंट म्हणून काम पाहता येते. त्याशिवाय लेखक म्हणूनही यामध्ये करिअर आहे. आयआयटी कानपूर आणि ओ.पी. जिन्दाल ग्लोबल युनिव्हर्सिटी या विद्यापीठातून सायबर कायद्यासंबंधी अभ्यासक्रम आहेत.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New areas cyber law yuvraj narvankar lawyer ysh

Next Story
संवाद महत्त्वाचा – डॉ. राजेंद्र बर्वे
फोटो गॅलरी