न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार एनपीसीआयएल अपरेंटिस भरती २०२१  साठी अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in द्वारे १३ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. तथापि, अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०२१ आहे. अर्ज प्रक्रिया २५  ऑगस्टपासून सुरू झाली आहे.

या पदांसाठी होणार भरती

या प्रक्रियेद्वारे एकूण १०७ पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये फिटरची ३० पद, टर्नरची ४ पद, मशीनिस्टची ४ पद, इलेक्ट्रीशियनची ३० पद , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकची ३०  पद, वेल्डरची ४  पद, संगणक ऑपरेटरची ५ पद आणि प्रोग्रामिंग सहाय्यकाची पद समाविष्ट आहेत.

UPSC
UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार
knee pain
गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण! पूर्ण गुडघ्याऐवजी फक्त घर्षण झालेला भाग बदलून उपचार

पात्रता

वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जर उमेदवाराने एक वर्षाचा ITI कोर्स केला असेल तर त्याला दरमहा ७७०० रुपये स्टायपेंड दिला जाईल. तर, दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवारांना दरमहा ८८५५ रुपये मानधन मिळेल.

वयोमर्यादा किती?

वयोमर्यादेबद्दल बोलताना, अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १४ वर्षापेक्षा कमी आणि  २४ वर्षापेक्षा जास्त नसावे. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत दिली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

असा करा अर्ज

आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड अप्रेंटिस पदांसाठी केली जाईल. इच्छुक उमेदवारांना सर्वप्रथम कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय http://www.apprenticeship.gov.in च्या वेब पोर्टलवर प्रशिक्षणार्थी पदावर भरतीसाठी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना NPCIL च्या आस्थापना नोंदणी क्रमांक E08160800303 द्वारे अर्ज करावा लागतो. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.