scorecardresearch

NTPC Recruitment 2021: NTPC अंतर्गत ५३ रिक्त पदांची भरती, जाणून घ्या तपशील

एनटीपीसी लिमिटेड ने कारागीर प्रशिक्षणार्थी पदासाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

NTPC Recruitment 2021: NTPC अंतर्गत ५३ रिक्त पदांची भरती, जाणून घ्या तपशील
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) येथे अप्रेंटीस पदाच्या एकूण ५३ रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. तसेच रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ आहे. एनटीपीसी कारागीर प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्ज हे विनामूल्य करण्यात आले आहे.

NTPC भरती रिक्त पदांचा तपशील

कारागीर प्रशिक्षणार्थी (फिटर) – २६ पदे

कारागीर प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रीशियन) – ०६ पदे

कारागीर प्रशिक्षणार्थी (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) – २१ पदे

एकूण- ५३ पदे

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील हा एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहिती वाचण्यासाठी https://bit.ly/2VdlHmO या लिंकवर जाऊन PDF स्वरुपातील जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा

एनटीपीसी कारागीर प्रशिक्षणार्थी पदासाठी कमाल वयोमर्यादा ४२ वर्षे आहे. यामध्ये आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वरच्या वयोमर्यादेत सवलत मिळेल.

अशी असेल निवड प्रक्रिया

पात्र उमेदवारांना वस्तुनिष्ठ प्रकार बहुपर्यायी दोन तासांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. या लेखी परीक्षेत विषय ज्ञान चाचणी आणि अभियोग्यता चाचणी अशा दोन्ही चाचण्या समाविष्ट केल्या आहेत. तसेच सर्व शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. यशस्वी उमेदवारांची गुणवत्ता यादी लेखी चाचणी आणि एसक्यूएल चाचणीमधील कामगिरीच्या आधारे तयार केली जाणार आहे. यानंतर अंतिम गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

या पत्त्यावर पाठवा अर्ज

उमेदवार भरतीसाठीचा अर्ज एनटीपीसीच्या http://www.ntpc.co.in या अधिकृत वेबसाईडद्वारे भरून या अर्जची प्रिंट काढून अर्ज आस्थापना विभाग प्रमुख, मानव संसाधन विभाग मौदा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट मौदा – रामटेक रोड, पोस्ट: मौदा जिल्हा: नागपूर महाराष्ट्र – 441104 या पत्त्यावर पाठवायचा आहे. उमेदवारांनी पूर्ण अर्ज विहित नमुन्यात भरावा आणि २१सप्टेंबरपर्यंत विहित पत्त्यावर पाठवावा. उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. अधिसूचना तपासण्यासाठी उमेदवार ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान रोजगार हे वृत्तपत्र पाहू शकतात.

 

 

 

 

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या