सैन्यदलात कायदा पदवीधरांची नेमणूक करण्यासाठी  अर्हताप्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागांचा तपशील : एकूण जागांची संख्या १४ असून, यापैकी १० जागा पुरुष उमेदवारांसाठी तर ४ जागा महिला उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी कायदा विषयातील एलएलबी पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय २१ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सैन्यदलात निवड मंडळातर्फे निवड परीक्षा, मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची नेमणूक करण्यात येईल.
वेतनश्रेणी, भत्ते व लाभ : निवड झालेल्या उमेदवारांना सैन्यदलाच्या कायदा विभागात लेफ्टनंट म्हणून सुरुवातीला प्रशिक्षण तत्त्वावर नेमण्यात येईल. प्रशिक्षण कालावधीत त्यांना दरमहा २१ हजार रु. एकत्रित मासिक वेतन देण्यात येईल.
प्रशिक्षण कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सैन्यदलाच्या नियमांनुसार नियमित मूळ वेतन, इतर भत्ते, लाभ व भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलब्ध होतील.
अधिक माहिती : अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जुलै २०१५ अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाच्या कायदा विभागाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in   या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत :  वरील संकेतस्थळावर २ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.