होमी भाभा सेंटर फॉर सायन्सअंतर्गत कार्यरत असणाऱ्या टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे  संशोधनपर पीएच.डी.साठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उद्देश व पाश्र्वभूमी
या योजनेचा मुख्य उद्देश गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षक-प्राध्यापकांना विज्ञानविषयक शिक्षणाला चालना देणे, शैक्षणिक लिखाणाला उत्तेजन देणे, विद्यार्थ्यांच्या विज्ञान शिक्षणाला चालना देणे, अशा शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नवनव्या, कल्पक प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, सर्व संबंधितांमध्ये संवाद
साधणे हा आहे.
संशोधनासाठी उपलब्ध विषय
या योजनेअंतर्गत गणित व विज्ञान विषयांच्या प्राथमिक शिक्षणापासून पदवी शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमासंबंधी संशोधन, प्रयोगशाळांची नव्याने फेररचना, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कल्पकतेला प्रोत्साहन मिळणे, विषयांच्या प्रगत अभ्यासक्रमासाठी दृक-श्राव्य शैक्षणिक साधनांचा उपयोग करणे, नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग साधणे, विज्ञान-गणित शिक्षणाला ज्ञानाधिष्ठित करणे, यांसारखे विषय प्रस्तावित पीएच.डी. साठी २०१५ या शैक्षणिक सत्रासाठी उपलब्ध आहेत.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. त्यांनी कुठल्याही विषयातील एमएस्सी, एमएसडब्ल्यू, शिक्षण, मानसशास्त्र यांसारख्या विषयातील एमए, बीटेक, बीई, एमबीबीएस यांसारखी पात्रता प्राप्त केलेली असावी. त्यांना संशोधनपर कामात रुची असावी आणि संगणकाचे अद्ययावत ज्ञान असावे.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर
१७ मे २०१५ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
अर्जदार विद्यार्थ्यांच्या निवड पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना समूह चर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित विषयातील संशोधनपर पीएच.डी.साठी निवड करण्यात येईल.
संशोधनपर शिष्यवृत्तीचा तपशील
निवड झालेल्या संशोधकांच्या संशोधनाचा कालावधी एक ते पाच वर्षांचा असेल. दरम्यान त्यांना दरमहा १६ हजार ते १८ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना संशोधन काळात ३० टक्के घरभाडे भत्ता व वार्षिक आकस्मिक खर्चापोटी २० हजार रुपये देण्यात येतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे परीक्षा शुल्क म्हणून ४०० रु.चा ‘होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टीआयएफआर’च्या नावे असणारा व मुंबई येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनच्या दूरध्वनी क्र. ०२२-२५०७२३०४ वर संपर्क साधावा अथवा सेंटरच्या http://www.hbcse.tifr.res.in/admissions या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूण भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज ग्रॅज्युएट स्कूल अ‍ॅडमिशन्स- २०१५, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, वि. ना. पुरव मार्ग, मुंबई- ४०००८८ या पत्त्यावर ३१ मार्च २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.