उमेदवाराने आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरताना तयार केलेले किंवा अद्ययावत केलेले प्रोफाइल हा एका अर्थाने मुलाखतीचा अभ्यासक्रम मानला जातो. मुलाखतीची दिशा ठरते ती या प्रोफाइलमधून सादर केलेल्या वैयक्तिक माहितीच्या आधारे. सर्वसाधारणपणे ६० टक्के ते ७० टक्के प्रश्न उमेदवाराच्या वैयक्तिक माहितीच्या आधारावर विचारले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेदवाराची वैयक्तिक माहिती ऑनलाइन प्रोफाइलद्वारे मुलाखत मंडळाकडे उपलब्ध असते. पण यातील उमेदवाराचे नाव, गाव या व्यक्तिगत माहितीचे पहिले व दुसरे पान मुलाखत मंडळासमोर नसते. या व्यतिरिक्त उमेदवाराचे छंद, विशेष प्रावीण्याचे विषय, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, पदांचा पसंतीक्रम अशी सर्व माहिती पॅनलसमोर असते. या माहितीच्या आधारे मुलाखत घेतली जाते. त्यामुळे प्रोफाइलमध्ये विचारण्यात आलेली माहिती खूप काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. छंद, विशेष प्रावीण्याचे विषय (Extra Curricular activities) इत्यादी माहिती संक्षिप्त मात्र परिपूर्ण असायला हवी.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparation of interview
First published on: 02-11-2015 at 02:25 IST