पुण्यात नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे (DPCA पुणे) सेवा निवृत्त पोलीस अधिकारी पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना https://punepolice.gov.in/ या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे (डीपीसीए पुणे) भर्ती मंडळ, पुणे यांनी सप्टेंबर २०२१ च्या जाहिरातीत एकूण ०३ रिक्त पदांची घोषणा केली आहे. १ ऑक्टोबर २०२१ रोजी थेट बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह मुलाखत द्यायला जावे लागणार आहे.
पात्रता काय हवी?
गुन्हे अन्वेषण, लाचलुचपत विभाग, अतिदक्षता विभाग, गुप्त वार्ता दक्षता विभाग आणि राज्य मानवी हक्क आयोगाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त अधिकारी या पदांसाठी आवश्यक आहेत.
निवड प्रक्रिया कशी असेल?
या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर वेळेवर उपास्थित रहावे.
मुलाखतीसाठी पत्ता काय?
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे या पत्त्यावर सकाळी ११ वाजल्यापासून मुलाखती सुरु होतील.
लक्षात ठेवा मुलाखतीची तारीख १ ऑक्टोबर २०२१ आहे.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
पासपोर्ट साईझ फोटो
कोणतंही एक ओळखपत्र
सेवानिवृत्त असल्याचा दाखला
PPO ची कागदपत्रं आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं
ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://www.punepolice.gov.in या वेबसाईटवर जा. आणि अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन वाचा.