Railway Recruitment 2022: रेल्वेत भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने क्रीडा कोटा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. रिक्त पदांची संख्या २१ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SECR च्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोंदणीची अंतिम तारीख ५ मार्च २०२२ आहे. ज्या उमेदवारांना लेव्हल २/३ च्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय त्यांच्याकडे खेळाशी संबंधित कामगिरी असायला हवी.

(हे ही वाचा: India Post Recruitment 2022: दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक)

लेव्हल ४ आणि लेव्हल ५ पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराकडे स्पोर्ट्स अचीवमेंट असावे.

वायोमार्यदा काय?

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे आहे. कोणत्याही उमेदवाराला वयोमर्यादेत सवलत मिळणार नाही.

(हे ही वाचा: Oil India Limited Recruitment 2022: ऑइल इंडिया लिमिटेड विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या तपशील)

अर्ज फी किती?

अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून ५०० रुपये भरावे लागतील. SC/ST प्रवर्गातील इतर उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु.२५० भरावे लागतील. उमेदवार SECR च्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर अर्ज करू शकतात.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway recruitment 2022 great job opportunities in railways find out the relevant details ttg
First published on: 04-03-2022 at 10:14 IST