RBI Recruitment 2021: भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये परीक्षेविना भरती

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.

RBI Recruitment 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२१ आहे.

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असणार्‍या उमेदवारांना आता चांगली संधी उपलब्ध झाली आहे.भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत बँक वैद्यकीय सल्लागार पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२१ आहे. पात्र अर्जदारांना परीक्षा न घेता केवळ मुलाखतीच्या आधारावर नोकरी दिली जाईल.

आरबीआय (RBI) ने बँक्स मेडिकल कन्सल्टंट (RBI BMC) पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. तुम्ही हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करू शकतात. तसेच रिझर्व्ह बँकेने नोकरीसंबंधी जारी केलेल्या अधिसूचनेत अधिकृत वेबसाईट opportunities.rbi.org.in वर जारी करण्यात आली आहे. याकरिता इच्छुक उमेदवारांनी या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.

या उमेदवारांनी करावा अर्ज

मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया अ‍ॅलोपॅथी सिस्टीमच्या मान्यताप्राप्त विद्यापीठ तसेच संस्थेतून एमबीबीएस पदवी आवश्यक आहे. याशिवाय ज्या उमेदवारांनी जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. ते देखील आरबीआय वैद्यकीय सल्लागार भरतीसाठी अर्ज करू शकतात. याचबरोबर उमेदवारांना हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून किमान २ वर्षांचा अनुभव असावा.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड प्रक्रिया ही वैयक्तिक मुलाखतीत कामगिरीच्या आधारे केली जाणार आहे. तसेच निवड झालेल्या अर्जदारांची मुलाखतीनंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवार प्राचार्य, कृषी कृषी महाविद्यालय, भारतीय रिझर्व्ह बँक, युनिव्हर्सिटी रोड, पुणे – ४११०१६ येथे ५ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करू शकतात. तसेच मुंबई या ठिकाणी मुख्य महाव्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय कार्यालय, 20 वा मजला, मध्यवर्ती कार्यालय इमारत, शहीद भगतसिंग मार्ग, किल्ला, मुंबई – ४००००१ या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकतात. अर्ज सीलबंद कव्हरमध्ये पाठवायचा आहे. पाकिटावर ‘बँकेच्या वैद्यकीय सल्लागार पदासाठी कराराच्या आधारावर निर्धारित तासिका मोबदल्यासह अर्ज’ असे लिहावे.

अधिक माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या PDF जाहिरात वाचावी..

Click to access BMCC08092021A073954EF24A4287A941FA7A7EEF84B2.PDF

रिक्त जागा आणि ठिकाण

 • पुणे
  पदाचे नाव – बँक वैद्यकीय सल्लागार
  पद संख्या – 01 जागा
  शैक्षणिक पात्रता – MBBS degree of any recognized university
  अर्ज पद्धती – ऑफलाईन
  नोकरी ठिकाण – पुणे
  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2021 आहे.
  अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, कृषी बँकिंग महाविद्यालय, भारतीय रिझर्व्ह बँक, युनिव्हर्सिटी रोड, पुणे – 411016
  अधिकृत वेबसाईट – http://www.rbi.org.in
 • मुंबई
  पदाचे नाव – अधीक्षक अभियंता (दक्षता)
  अर्ज पद्धती – ऑफलाईन
  नोकरी ठिकाण – मुंबई
  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.
  अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय कार्यालय, 20 वा मजला, मध्यवर्ती कार्यालय इमारत, शहीद भगतसिंग मार्ग, किल्ला, मुंबई – 400001
  अधिकृत वेबसाईट – http://www.rbi.org.in

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rbi recruitment 2021 for bmc post here are bank job details scsm

ताज्या बातम्या