भारतीय डाक विभाग पोस्टमन, मेल गार्ड मल्टी टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी ९८ हजारांहूनही अधिक रिक्त जागांवर भरती करणार आहे. यासंबंधीची माहिती डाक विभागाच्या अधिकृत वेब पोर्टलवर जारी करण्यात आली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवारही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच सांगितली जाणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३२ यादरम्यान असावे.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल कसा करावा?

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनी खालील पायऱ्यांचे अनुकरण करावे.

Home Voting for Elderly and Disabled Voters, Home Voting Facility Initiated, Home Voting nagpur district, lok sabha 2024, lok sabha phase 1, election 2024, election news,
मतदानापूर्वी गृहमतदान, काय आहे ही पध्दत?‘ हे ’ ठरले प्रथम गृह मतदार
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
pmp and rto taken joint action against 1620 errant rickshaw drivers
बसस्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या १,६२० चालकांवर कारवाई, पीएमपी, आरटीओची मोहीम
Transfer, social justice department
सामाजिक न्याय विभागात एकच अधिकारी दहा वर्षांपासून एकाच पदावर, पुन्हा नवीन कार्यभार…
  • सर्वप्रथम इंडिया पोस्ट वेब पोर्टल indiapost.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पोर्टलच्या मुख्यपृष्ठावरील ‘इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2022’ या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Register Now’ वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसणार्‍या आवश्यक तपशीलांसह संपूर्ण अर्ज भरावा लागेल.
  • उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे नोंदणी फॉर्मसह अपलोड करावी.
  • यामध्ये उमेदवाराचे नाव, फोन नंबर, लिंग, श्रेणी आणि जन्मतारीख यासह इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करावी.
  • तुमच्या फोन नंबरवर पडताळणीसाठी ओटीपी प्राप्त होईल.
  • कोणत्याही मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये अर्जाची फी ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरा.
  • त्यानंतर, तुमचा नोंदणी फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केला जाईल.
  • भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या.

निवड प्रक्रिया

ग्रामीण डाक सेवक

  • शैक्षणिक योग्यता
  • दस्तऐवज पडताळणी

पोस्टमन / मेल गार्ड आणि एमटीएस

  • ऑनलाइन लेखी परीक्षा
  • दस्तऐवज पडताळणी

पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक

  • ऑनलाइन परीक्षा
  • संगणक चाचणी / टायपिंग
  • दस्तऐवज पडताळणी

कर्मचारी कार चालक

  • ड्रायव्हिंग टेस्ट (LMV आणि HMV)
  • कुशल कारागीर
  • स्पर्धात्मक व्यवसाय चाचणी