जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे विविध पदांसाठी होणार भरती; पदवीधर करू शकतात अर्ज

गडचिरोली येथे एकूण ०६ रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२१ आहे. (photo: gadchiroli.gov.in)

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सल्लागार, लघुलेखक पदाच्या एकूण ०६ रिक्त जागा भरण्यासाठी या पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२१ आहे.

या रिक्त पदांसाठी भरती

तांत्रिक अधिकारी

डेटा विश्लेषक

कृषी विशेषज्ञ

विकास विशेषज्ञ

समन्वयक

स्टेनोग्राफर

या पदांसाठी ही भरती असणार आहे.

शिक्षण पात्रता आणि अनुभव

– तांत्रिक अधिकारी (Technical Officer) या पदाकरिता संबंधित विषयात B.E./B.Tech./MCA पदवी असणे आवश्यक आहे.

– डेटा विश्लेषक (Data Analyst) या पदाकरिता उमेदवारांकडे MCA/M.Sc. Statistics/Computer Science ही पदवी असणे आवश्यक आहे.

– कृषी विशेषज्ञ (Agriculture Specialist) या पदा करिता M.Sc. Agriculture/Environment/Biodiversity ही पदवी आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

– विकास विशेषज्ञ (Development Specialist) – B.E./B.Tech./MBA पदवी असणे आवश्यक आहे.

– समन्वयक (Coordinator) या पदाकरिता पात्र उमेदवाराचे Arts मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा MBA पदवी असणे आवश्यक आहे.

– स्टेनोग्राफर (Stenographer) या पदाकरिता उमेदवार पदवीधर आणि संबंधित पदाविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज

आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली या पत्त्यावर उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज पाठवायचा आहे.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२१ आहे. तसेच या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://gadchiroli.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Recruitment for various posts at collectorate gadchiroli graduates can apply scsm

ताज्या बातम्या