scorecardresearch

District Court Akola Bharti 2022: जिल्हा सत्र न्यायालयात भरती, दहावी उत्तीर्णांना संधी; पगार ५६ हजारपर्यंत

लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२२ आहे.

job
(फोटो: Pixabay)

अकोला जिल्हा न्यायालयात (District Court Akola) बुक बाइंडर (Bookbinder) पदाची भरती केली जाणार आहे. या पदासाठी दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदाचे नाव – बुक बाइंडर

पदसंख्या – ०४ जागा

शैक्षणिक पात्रता – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावे. उमेदवारांकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून बुक बाइंडिंगचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.

अनुभव – बुक बाइंडिंगची तांत्रिक आणि व्यवसायीक माहिती आणि संबंधित कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य देण्यात येणार आहे.

नोकरी ठिकाण अकोला

(हे ही वाचा: BARC Recruitment 2022: भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये अनेक पदांसाठी भरती; दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी)

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – १८ ते ३८ वर्षे

राखीव प्रवर्गासाठी – १८ ते ४३ वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज शुल्क – उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट – districts.ecourts.gov.in

(हे ही वाचा: Nashik Mahanagarpalika Recruitment 2022: नाशिक महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ४० हजार रुपये)

आवश्यक कागदपत्रे

१. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे

२. दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं

३. शाळा सोडल्याचा दाखला

४. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

५. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

६. सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे.

७. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

(हे ही वाचा: Ministry of Defence Recruitment 2022: दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, पगार ५५ हजाराहून अधिक)

बुक बाइंडर पदावर निवड झालेल्या उमेदवारांना अकोला जिल्ह्यातील कोणत्याही न्यायालयात नोकरीसाठी नियुक्त केले जाईल. दरम्यान, उमेदवारांना न्यायालयाच्या ग्रंथालयातील पुस्तकांची बांधणी तसेच न्यायालयातील राखण्यात येणा-या फाईल्स, नोंदवहया इत्यादी ची बांधणी अशी कामे करावी लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर एस-५ संरचनेत रूपये १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये पगार दिला जाणार आहे. तसेच नियमानुसार इतर भत्ते देखील मिळणार आहेत.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Recruitment in district sessions court akola opportunity for 10th passers salary 56 thousand ttg

ताज्या बातम्या