RSMSSB VDO Recruitment 2021: राजस्थानमध्ये ३८०० हून अधिक पदांसाठी भरती! जाणून घ्या अधिक माहिती

राजस्थानमध्ये ग्राम विकास अधिकारी या पदाकरिता ३८०० हून अधिक जागांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

lifestyle
आता राजस्थानमध्ये ३८००हून अधिक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आता राजस्थानमध्ये ३८००हून अधिक पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. राजस्थान कर्मचारी निवड मंडळाने ग्रामविकास अधिकारी (RSMSSB Recruitment 2021) च्या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण ३८९६ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. दरम्यान या पदांसाठी उमेदवारांनी निवड मंडळाच्या अधिकृत वेबसाइट http://www.rsmssb.rajasthan.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.

रिक्त पदे

गैर अनुसूचित क्षेत्र – ३,२२२ पदे

अनुसूचित क्षेत्र – ६७४ पदे

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे ओ ग्रेड लेव्हल असलेले प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ४० वर्षे असावे. तसेच SC, ST, OBC उमेदवारांना वरच्या वयोमर्यादेमध्ये ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क

अर्ज फीकरिता सामान्य श्रेणी असलेले उमेदवारांना ४५० रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार या भरतीशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्याकरिता जारी केलेल्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकता.

निवड प्रक्रिया

पदांच्या निवडी करिता उमेदवारांची निवड लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यांत ही परीक्षा घेतली जाईल. प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवारच मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील.

महत्वाच्या तारखा

  • अधिसूचना जारी करण्याची तारीख – ६ सप्टेंबर २०२१
  • अर्ज सुरू करण्याची तारीख – १० सप्टेंबर २०२१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑक्टोबर २०२१
  • अधिकृत वेबसाईट – http://www.rsmssb.rajasthan.gov.in

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rsmssb vdo recruitment 2021 jobs for more than 3800 posts in rajasthan scsm

ताज्या बातम्या