सातारा येथील किसन वीर महाविद्यालय येथे एकूण ६१ जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदासाठी ही भरती असणार आहे. उमेदवार यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. लक्षात घ्या मुलाखतीची तारीख १२ ऑक्टोबर २०२१ असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पदासाठी होणार भरती

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

पात्रता आणि अनुभव किती?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं देखील आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता काय?

किसान वीर महाविद्यालय, पाचगणी रोड, ता. वाई, जि. सातारा, महाराष्ट्र, पिन ४१२८०३ येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

अन्य महत्त्वाच्या गोष्टी

ही पदभरती ९ महिन्यांच्या कालावधीसाठीची ही भरती असणार आहे.

महाराष्ट्राच्या बाहेरील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात मोजले जाणार आहे.

कोणत्याही इतर महाविद्यालयांमध्ये काम करत नसल्याचं ऍफिडेव्हिट सादर करावे.

दिलेल्या संबंधित पत्त्यावर वेळेत मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित रहावे.

More Stories onजॉबJob
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara job alertkisan veer mahavidyalaya wai recruitment 2021 sarkari naukri 61 opening ttg
First published on: 05-10-2021 at 18:05 IST