SBI Clerk Recruitment 2022 vacancies: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ग्राहक समर्थन आणि विक्री विभागात लिपिक गटातील कनिष्ठ पदासाठी मोठी भरती निघाली आहे. देशभरातील विविध राज्यांमधून तब्ब्ल ५००० हुन अधिक जागा रिक्त आहेत. यापैकी महाराष्ट्रात तब्बल ७४७ जागांसाठी नोकरभरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय च्या अधिकृत वेबसाइट – bank.sbi/careers किंवा sbi.co.in वर अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड नोव्हेंबरमध्ये होणारी प्राथमिक परीक्षा आणि डिसेंबर २०२२/जानेवारी २०२३ मध्ये होणारी मुख्य परीक्षा याच्या आधारे केली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्वाच्या तारखा

  • अर्ज प्रक्रिया सुरूवात: ७ सप्टेंबर २०२२
  • अर्ज प्रक्रिया अंतिम तारीख: २७ सप्टेंबर २०२२

पात्रता निकष

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पदवी प्राप्त असायला हवी
  • IDD प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी IDD उत्तीर्ण होण्याची तारीख 30.11.2022 किंवा त्यापूर्वीची आहे याची खात्री करावी.
  • जे त्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात/सेमिस्टरमध्ये आहेत त्यांनी तात्पुरती निवड केल्यास, त्यांना 30.11.2022 रोजी किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल या अटीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात अर्ज करू शकतात.

SBI लिपिक भरती २०२२ साठी वयोमर्यादा

उमेदवार किमान २० व जास्तीत जास्त २८ वर्षांपर्यंतचा असावा. म्हणजे उमेदवारांचा जन्म २/ ०८/१९९४ पूर्वी आणि १/०८/२००२ च्या नंतर झालेला नसावा (दोन्ही दिवसांसह).

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi clerk recruitment 2022 vacanciesmore than 5000 posts in state bank see how you can apply svs
First published on: 11-09-2022 at 11:19 IST