SBI Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवत आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट — sbi.co.in — ला भेट देऊ शकतात. या भरती मोहिमेद्वारे, SBO संस्थेतील १४ रिक्त जागा भरण्याची योजना आखत आहे. रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १६ जून २०२२ पर्यंत वेळ आहे.

अर्ज कसा करायचा?

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या — sbi.co.in
  • त्यानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइट — bank.sbi/careers किंवा sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करा.
  • सर्व आवश्यक तपशील भरा, स्वाक्षरी, छायाचित्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • सबमिट वर क्लिक करा.
  • जेव्हा माहिती/अॅप्लिकेशन सेव्ह केले जाते, तेव्हा सिस्टमद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जातो आणि स्क्रीनवर प्रदर्शित होतो. उमेदवाराने नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लक्षात ठेवावा.
  • ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर, उमेदवारांना प्रणालीद्वारे तयार केलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट घेण्याचा सल्ला दिला जातो.

(हे ही वाचा: BMC Bharti 2022 : ११३ रिक्त पदांसाठी भरती; पदवीधर करू शकतात अर्ज)

Central Bureau of Investigation Bharti various vacant posts of Consultants job location is Mumbai
CBI Bharti 2024 : सल्लागार पदासाठी सीबीआयमध्ये पदभरती; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Sainik School Satara Bharti 2024
Sainik School Satara Bharti : सैनिक स्कूल सातारामध्ये नोकरीची संधी, महिन्याला मिळेल ३८ हजार रुपयांपर्यंत पगार
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती

जागांचा तपशील

अधिकृत अधिसूचनेनुसार, रिस्क स्पेशालिस्ट सेक्टरसाठी जवळपास सात जागा, रिस्क स्पेशालिस्ट क्रेडिट आणि रिस्क स्पेशालिस्ट क्लायमेट रिस्कमध्ये प्रत्येकी एक पदे आहेत. रिस्क स्पेशालिस्ट आयएनडी एएस साठी तीन जागा आणि रिस्क स्पेशलिस्ट मार्केट रिस्क साठी दोन रिकाम्या जागा आहेत.

(हे ही वाचा: DRDO INMAS Recruitment 2022: पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; पगार ३१,००० रुपये)

पात्रता आणि तपशील

या सर्व रिक्त जागा मुंबईबाहेरच्या आहेत आणि इच्छुक उमेदवारांचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे (३१ मार्च २०२२ पर्यंत). अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवाराकडे निर्दिष्ट तारखेनुसार संबंधित पूर्ण-वेळ अनुभव असणे आवश्यक आहे आणि नियोक्त्याच्या संबंधित अनुभव प्रमाणपत्रामध्ये उमेदवाराला आवश्यकतेनुसार संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत नोटीफिकेशन पाहावे.

(हे ही वाचा: IBPS RRB 2022 Notification Out: बँक पीओ, लिपिक ते अधिकारी अशा विविध पदांसाठी होणार भरती; आजपासून अर्जप्रक्रिया सुरु)

निवड प्रक्रिया काय?

उमेदवारांनी लक्षात ठेवावे की निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल. निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.