विविध देशांमधील सर्व विद्याशाखांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्या त्या विषयात संशोधन करता यावे यासाठी ‘एज्युकेशन न्यूझीलंड’तर्फे एक संशोधन कार्यक्रम राबवला जातो. न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय डॉक्टरल संशोधन शिष्यवृत्ती कार्यक्रमाची माहिती-
देशोदेशींच्या सर्व विद्याशाखांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधन करता यावे, यासाठी न्यूझीलंड सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे म्हणजेच  ‘एज्युकेशन न्यूझीलंड’तर्फे एक संशोधन कार्यक्रम राबवला जातो. न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय डॉक्टरल संशोधन शिष्यवृत्ती कार्यक्रम (New Zealand International Doctoral Research Scholarships -NZIDRS) हे त्याचं नाव. या कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्यांसाठी देशोदेशींच्या अर्जदारांकडून (न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व फिजी या तीन देशांमधील अर्जदारांव्यतिरिक्त) १५ जुल २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल :
विविध क्षेत्रांमधील जागतिक गुणवत्तेला आकर्षति करून त्या माध्यमातून न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विविध घटकांच्या सकारात्मक परिणामांचा व त्यांच्या प्रभावाचा अभ्यास करणे आणि त्यातून न्यूझीलंडची अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार-उद्योगाच्या विकासाला चालना देणे, या हेतूने या शिष्यवृत्तीची रचना करण्यात आली आहे. ‘न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय डॉक्टरल संशोधन शिष्यवृत्ती कार्यक्रमा’ अंतर्गत सर्व विद्याशाखांमधील आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबवला जातो. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला त्याचे शिकवणी शुल्क भरता येईल. त्याला मिळणारा एकूण वार्षकि भत्ता २५ हजार न्यूझीलंड डॉलर्स किंवा प्रतिमाह दोन हजार डॉलर्स एवढा असेल. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षांचा असेल.
शिष्यवृत्तीमध्ये त्याच्या तीन वर्षांच्या वैद्यकीय विमा सुरक्षेचाही समावेश असतो. या शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्तीधारक न्यूझीलंडमधील िलकन विद्यापीठ, मॅसे, ऑकलंड, एयूटी, कँटरबरी, ओटागो, वैकाटो आणि व्हिक्टोरिया विद्यापीठ या आठ विद्यापीठांपकी कोणत्याही एका विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येईल.
आवश्यक अर्हता :
ही शिष्यवृत्ती न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व फिजी या तीन देशांमधील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त सर्व देशांमधील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. ‘एज्युकेशन न्यूझीलंड’च्या नियमांनुसार, खालील निकषांवर अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतो-
१.    विद्यार्थ्यांच्या अगदी अलीकडील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये त्याचा जी. पी. ए. (Grade Point Average) ३.६ /४ किंवा अ / अ+ असावा.
२. न्यूझीलंडमध्ये पूर्ण वेळ पीएच.डी. करण्याची त्याची तयारी असावी.
३.    न्यूझीलंडमध्ये थेट पीएच.डी. प्रवेशासाठी आवश्यक असणारे निकष पूर्ण करावेत. म्हणजेच त्याच्याकडे पदव्युत्तर पदवी असावी
४.    त्याने टोफेल अथवा IELTS या इंग्रजी भाषेच्या दोन्हींपकी एका परीक्षेत उत्तीर्ण असावे.
५.    विद्यार्थ्यांची पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी.
६.    त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असावे.
७.    अर्जदाराने जीआरई परीक्षा दिली असेल तर विद्यापीठाला जीआरईचे गुण कळवावेत.
अर्ज प्रक्रिया :
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज NZIDRS  च्या वेबसाइटवरून डाऊनलोड करून घ्यावा. अर्जामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून अर्ज पूर्ण भरलेल्या स्वरूपात आंतरराष्ट्रीय टपालाने संबंधित विद्यापीठाच्या प्रवेश कार्यालयाला (Office of admission) पाठवावा. त्या अर्जाबरोबर अर्जदाराला इतर आवश्यक कागदपत्रे म्हणजे त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी. (Statement of Purpose), आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्स्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, त्याचा सी.व्ही., त्याच्या शैक्षणिक किंवा संशोधन पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांचे किंवा प्रकल्प मार्गदर्शकांचे (Project Guide)  ई-मेल आयडीज पाठवावे लागतील. संबंधित विद्यापीठ नंतर त्या प्राध्यापकांकडून शिफारसपत्रे मागवून घेईल.
निवड प्रक्रिया:
NZIDRS शिष्यवृत्तीच्या निवडीची संपूर्ण प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित आहे. निवड प्रक्रियेमध्ये आणखी एका गोष्टीला महत्त्व आहे, ते म्हणजे अर्जदाराला अर्जासोबत पाठवावा लागणारा भावी संशोधन प्रकल्प अहवालाचा प्रस्ताव. (Proposed research plan). या अहवालामध्ये न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विविध घटकांच्या सकारात्मक परिणामांचा प्रभाव असावा. तसेच त्याचा दर्जा निश्चितच आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांच्या पातळीचा असावा. अर्जदारांना त्यांच्या निवडीबद्दल १ जुल २०१४ पूर्वी कळवले जाईल.
अंतिम मुदत :
या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०१४ आहे.
महत्त्वाचा दुवा :
http://www.educationnz.govt.nz/how-we-work/scholarships/nzidrs                            
 itsprathamesh@gmail.com