श्रीमती विमलाबाई जठार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भारतीय विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च व पदव्युत्तर शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्तीसाठी  देण्यात येते. या ट्रस्टतर्फे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून खाली नमूद केल्यानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी त्यांची संबंधित पदवी परीक्षा कमीत कमी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते त्यांच्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत. याशिवाय त्यांनी त्यांच्या विदेशातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची निवड व प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली असावी.
या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ते त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणानंतर विदेशात स्थायिक होणार नाहीत, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना जून २०१४ मध्ये पुणे येथे मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल आणि मुलाखतीच्या आधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
योजनेअंतर्गत समाविष्ट देश : विमलाबाई जठार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेमध्ये विदेशातील युरोप, इंग्लंड व अमेरिका या ठिकाणच्या विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधील उपलब्ध असणाऱ्या पदव्युत्तर व उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या २०१४ च्या शैक्षणिक सत्रांचा समावेश असेल.
अधिक माहिती व तपशील : या योजनेअंतर्गत अधिक माहिती व तपशिलासाठी विमलाताई जठार चॅरिटेबल ट्रस्टच्या scnjat@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.
अर्ज करण्याची शेवटची पद्धत व शेवटची तारीख: संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज वरील ई-मेलवर २१ एप्रिल २०१४ पर्यंत पोहोचतील, अशा बेताने पाठवावेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scholarships for higher education in abroad
First published on: 14-04-2014 at 01:06 IST