एनटीपीसीतर्फे इंजिनीअरिंगमधील पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विशेष शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती गटातील असावेत व त्यांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल व इन्स्ट्रमेंटेशन इंजिनींअरिंगमधील पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. याशिवाय अर्जदार विद्यार्थी अन्य कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेंतर्गत लाभार्थी नसावेत.
शिष्यवृत्तींची संख्या : योजनेंतर्गत शिष्यवृत्तींची प्रस्तावित संख्या एनटीपीसीतर्फे निर्धारित करण्यात येईल.
शिष्यवृत्तीचा कालावधी व रक्कम : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदविका कालावधीदरम्यान म्हणजेच तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल. अभ्यासक्रम कालावधीत विद्यार्थ्यांनी चांगली टक्केवारी मिळविणे अपेक्षित आहे.
अभ्यासक्रमाच्या कालावधीच्या तीन वर्षांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १००० रु. शिष्यवृत्ती देण्यात येईल. ही शिष्यवृत्ती त्यांना दरवर्षी बारा महिने कालावधीसाठी देण्यात येईल.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली एनटीपीसीची अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रमासाठी प्रस्तावित शिष्यवृत्तीची जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज मॅनेजर (एचआर), एचआर डिपार्टमेंट, रूम नं. ३४, आर अण्ड डी बिल्डिंग, एनटीपीसी लिमिटेड, सेक्टर-२४, नोएडा २०१३०१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१३.