आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील अभ्यासक्रमामध्ये नमूद असलेल्या तंत्रज्ञान या घटकाकडे लक्ष देणार आहोत. या घटकाची एकत्रित परीक्षाभिमुख तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत. हा घटक जरी तंत्रज्ञान या नावाने अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेला असला, तरी त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून अभ्यास करावा लागतो. या घटकाअंतर्गत आपणाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास आणि याची उपयोगीता आणि याचे सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारे परिणाम, तसेच भारतीयांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मिळवलेले यश, नवीन तंत्रज्ञानाचा विकास याचबरोबर माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, संगणक, रोबोटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकार व संबंधित मुद्दे इत्यादी क्षेत्रामधील घडणाऱ्या घडामोडी अशा पद्धतीने या घटकाशी संबंधित मुद्दे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत.

२०१३-२०१७ पर्यंत झालेल्या पाच मुख्य परीक्षांमध्ये या घटकावर पुढीलप्रमाणे प्रश्न विचारण्यात आलेले होते.

mpsc Mantra General Science Non Gazetted Services Combined Pre Examination
mpsc मंत्र: सामान्य विज्ञान; अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
Sarvesh Mutha and Adar Poonawalla
‘सीरम’कडून इंटिग्रीमेडिकलच्या २० टक्के भागभांडवलाचे संपादन
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण
Google Generative Search AI Features in Marathi
Googleच्या जेमिनी-AI सह करता येईल ‘जेवणाचे प्लॅनिंग, व्हिडीओवरून शोध’! काय आहेत भन्नाट फीचर्स, पाहा
Apple iPad Pro Launch Marathi News
Apple iPad Pro चे प्री-बुकिंग सुरू! कॅमेरा, किंमत, खासियत सर्व काही घ्या जाणून…
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- नागरिकशास्त्र
magic of generative ai magic of generative technology
कुतूहल : जनरेटिव्ह तंत्रज्ञानाची कमाल
Loksatta UPSC Key
यूपीएससी सूत्र : भारतातील वणव्यांची समस्या अन् रस्त्यांवरचे खड्डे भरणारे ‘सेल्फ हीलिंग’ तंत्रज्ञान, वाचा सविस्तर…

२०१३मध्ये चार, २०१४ मध्ये तीन, २०१५ मध्ये चार, २०१६ मध्ये तीन आणि २०१७ मध्ये तीन इतके प्रश्न विचारण्यात आलेले होते. यातील काही प्रश्न खालीलप्रमाणे होते.

  • निश्चित मात्रा औषध संयोग यावरून काय समजते? याच्या गुण आणि दोषाची चर्चा करा. (२०१३)
  • भारतातील विद्यापीठामधील वैज्ञानिक संशोधन घटत आहे, कारण विज्ञानामधील करिअर हे इतके आकर्षक नाही की जे व्यापार व्यवसाय, अभियांत्रिकी किंवा प्रशासन यामध्ये आहे आणि विद्यापीठे ही उपभोक्ताभिमुख होत चाललेली आहेत. समीक्षात्मक टिप्पणी करा. (२०१४)
  • जागतिकीकरण झालेल्या जगात बौद्धिक संपदा अधिकार यांना विशेष महत्त्व आहे आणि हे खटल्याचे एक स्रोत बनले आहे. कॉपीराइट, पेटंट्स आणि व्यापार गुपिते यामध्ये सामन्यात: काय फरक आहे? (२०१४)
  • प्रतिबंधित श्रमाची कोणती क्षेत्रे आहेत जी यंत्रमानवाद्वारे सातत्याने व्यवस्थापित केली जाऊ शकतात? अशा उपक्रमांची चर्चा करा जे प्रमुख संशोधन संस्थामध्ये स्वतंत्र आणि नावीन्यपूर्ण लाभदायक संशोधनासाठी चालना देतील. (२०१५)
  • भारताने अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मिळवलेल्या उपलब्धींची चर्चा करा. कशा प्रकारे या तंत्रज्ञानाच्या प्रयोगाने भारतातील सामाजिक आणि आíथक विकासाला मदत केलेली आहे? (२०१६)
  • भारतातील आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची वाढ आणि विकास याचा वृतांत द्या. भारतात फास्ट ब्रीडर रिएक्टर प्रोग्रामचा (Fast Breeder Reactor Programme) काय फायदा आहे? (२०१७)

उपरोक्त प्रश्नाची आपण थोडक्यात चर्चा करू. बहुतांशी प्रश्न हे संकल्पना व त्यांचे आणि त्यामधील तांत्रिक बाबी यांचा एकत्रितपणे विचार करून विचारण्यात आलेले आहेत. २०१३ मधील जवळपास सर्व प्रश्न हे तंत्रज्ञानामधील संकल्पना, या संकल्पनांचा अर्थ, आणि यांची असणारी वैशिष्टय़े अशा पलूंवर विचारण्यात आलेले आहेत. निश्चित मात्रा औषध संयोग (FDCs), डिजिटल स्वाक्षरी (Digital Signature) आणि ३ आयामी मुद्रण (3D Printing) तंत्रज्ञान यासारख्या संकल्पना या वस्तुनिष्ठ पद्धतीच्या असतात आणि याची माहिती तुम्हाला असल्याशिवाय उत्तरे लिहिता येत नाहीत. २०१४ मधील प्रश्न हे संकल्पना आणि संशोधनातील स्थिती यासारख्या मुद्दय़ांवर विचारण्यात आलेले आहेत. उदा. विद्यापीठामध्ये संशोधनात होणारी घट यासारख्या महत्त्वाच्या पलूवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. थोडक्यात या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी संशोधन हे काय आहे तसेच याकडे उत्तम करिअर म्हणून का पाहिले जात नाही तसेच या क्षेत्रात इतर क्षेत्राच्या तुलनेत आíथक लाभाचे प्रमाण तसेच करिअरची उपलब्धता आणि सुरक्षितता नेमकी किती आहे? तसेच अशी स्थिती का झालेली आहे, याला नेमके कोणते घटक जबाबदार आहेत यासारख्या बाबींचा विचार करून याला विद्यापीठामधील संशोधनाच्या आकडेवारीचीही जोड द्यावी लागते; तेव्हाच या प्रश्नाचे उत्तर अधिक समर्पकपणे लिहिता येऊ शकते. २०१५मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचेही स्वरूप संकल्पनाधारित होते तसेच याच्या जोडीला या तंत्रज्ञानामुळे होणारे परिणाम, तंत्रज्ञानाची उपयुक्तता इत्यादी बाबींना गृहीत धरून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. २०१६ मध्ये नॅनो तंत्रज्ञान यावरही प्रश्न विचारण्यात आलेला होता तसेच २०१७ मध्ये चंद्रयान आणि मार्स ऑर्बटिर मिशन आणि स्टेम सेल थेरपी इत्यादीशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. थोडय़ाफार फरकाने प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे स्वरूप सारखेच आहे. कारण हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने अधिक वस्तुनिष्ठ आहे. त्यामुळे संबंधित संकल्पना, या संकल्पनाची वैशिष्टय़े आणि यांची असणारी उपयुक्तता इत्यादी बाबींची माहिती असणे अपरिहार्य ठरते, हे उपरोक्त प्रश्नावरून आपण समजून घेऊ शकतो.

हा घटक अभ्यासताना आपणाला दोन बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पहिली बाब या घटकामध्ये संकल्पनावर आधारित प्रश्न अधिक प्रमाणात विचारले जातात आणि दुसरी बाब या घटकावर विचारण्यात येणारे जवळपास सर्व प्रश्न हे या घटकाशी संबंधित चालू घडामोडींवर विचारले जातात. या घटकाचा अभ्यास करण्यासाठी त्याची मूलभूत माहिती देणारी अनेक गाइड्स स्वरूपात लिहिलेली पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत (उदा.  TMH   व  SPECTRUM ची गाइड स्वरूपातील पुस्तके) यांचा वापर आपणाला या घटकाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी करता येऊ शकतो. कारण ही पुस्तके नमूद अभ्यासक्रमानुसार लिहिलेली असतात त्यामुळे आपणाला प्रत्येक मुद्दय़ाची मूलभूत माहिती मिळते. या घटकाशी संबंधित चालू घडामोडीची तयारी करण्यासाठी द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस ही इंग्रजी दैनिके, सायन्स रिपोर्टर, डाऊन टू अर्थ ही मासिके, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संस्था, मंत्रालय याची संकेतस्थळे आणि मराठीमध्ये या घटकाशी संबंधित चालू घडामोडीसाठी द युनिक अकादमीद्वारे प्रकाशित ‘भारत वार्षकिी’मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित प्रकरण इत्यादीचा उपयोग करता येऊ शकतो. या पुढील लेखामध्ये आपण जैवविविधता आणि पर्यावरण या घटकाची चर्चा करणार आहोत.