हवे मदतीचे प्रशिक्षित हात!

नैसर्गिक आपत्ती असो, दुर्घटना वा दहशतवादी हल्ला असो, संकटात सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य तातडीने हाती घेणे क्रमप्राप्त असते. अशा वेळी प्रशिक्षित मनुष्यबळाची नितान्त गरज भासते. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित रीतसर अभ्यासक्रम विविध विद्यापीठांमध्ये सुरू झाले आहेत. त्याविषयी अधिक माहिती –

नैसर्गिक आपत्ती असो, दुर्घटना वा दहशतवादी हल्ला असो, संकटात सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य तातडीने हाती घेणे क्रमप्राप्त असते. अशा वेळी प्रशिक्षित मनुष्यबळाची नितान्त गरज भासते. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित रीतसर अभ्यासक्रम विविध विद्यापीठांमध्ये सुरू झाले आहेत. त्याविषयी अधिक माहिती –

गे ल्या महिन्यात झालेल्या उत्तराखंडमधील भीषण महाप्रलयाने उभा देश सुन्न झाला.. त्याआधी २०१० साली उद्भवलेले लेह लडाख भागातील ढगफुटीचे संकट, २००४ साली िहद महासागरात आलेल्या सुनामी लाटा, २००१ मध्ये गुजरातमध्ये झालेला महाभयंकर भूकंप.. या सर्व नसíगक आपत्तींमध्ये सर्वप्रथम गरज असते ती जीवितहानी रोखण्याची आणि तिथे अडकलेल्या व्यक्तींना सुखरूपपणे इच्छित स्थळी पोहोचवण्याची! आणि इथेच आपत्ती व्यवस्थापनाची (डिझास्टर मॅनेजमेन्ट) नितांत आवश्यकता असते. आपत्तीच्या ठिकाणच्या मृतदेहांची योग्य विल्हेवाट, तेथील स्थानिकांच्या तात्पुरत्या पण सुरक्षित निवासाची सोय, खाद्य व पिण्यायोग्य पाणीपुरवठा, जीवनावश्यक औषध योजना, अत्यवस्थ रुग्णांना योग्य ती वैद्यकीय मदत तात्काळ उपलब्ध करून देणे, हरवलेल्या व्यक्तींची नोंद ठेवणे आणि त्यासाठी शक्य ते शोधकार्य हाती घेणे, स्थानिकांच्या मदतीने आपत्कालीन ठिकाणच्या जीवनावश्यक सेवा पूर्ववत करण्याचे कार्य उदा. पाणी, वीज, दळणवळण, दूरध्वनी वगरे या आणि अशा अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण जवाबदाऱ्या आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पार पाडाव्या लागतात.
खरे पाहता ‘आपत्ती व्यवस्थापन’ ही संज्ञा खूप व्यापक आहे. जगातील लोकसंख्या, यांत्रिक व तांत्रिक कुशलता वाढत गेली आणि आपत्ती हा शब्द नसíगक संकटापुरता मर्यादित न राहता मानवनिर्मित दुर्घटनाही त्यात समाविष्ट झाल्या. उदा. दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, विद्युत जनित्रांचे जाणीवपूर्वक नुकसान, रासायनिक वा जैविक हल्ले, सायबर क्राइम, अंतर्गत बंडाळी वगरे.
आपत्ती व्यवस्थापनासाठी आपत्ती ओढवण्यापूर्वीपासूनच सज्ज राहावे लागते.
१) आपत्तीपूर्व प्रतिबंध- ठिकठिकाणच्या भौगोलिक परिस्थितींचा विचार करून संभाव्य नसíगक संकट टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलणे (भूकंपप्रवण क्षेत्रे, पुराचे संकट ओढवू शकणारे सखल भाग, धरण क्षेत्रे) यामुळे आपत्ती उद्भवलीच तरी होणारे जीवितहानी व वित्तहानीचे नुकसान कमी प्रमाणात होते. अर्थात हे फक्त नसíगक संकटांच्या बाबतीतच शक्य होते.
२) आपत्तीला तोंड देण्याची पूर्वतयारी- उदा. धोकादायक विभागातील मानवी वस्ती, प्राणी, महत्त्वपूर्ण कार्यालये यांचे वेळीच विस्थापन करणे आणि संभाव्य हानीचा अटकाव करणे.
३) आपत्ती निवारण कार्य- आपद्ग्रस्तांना सुखरूप ठिकाणी पोहोचवणे, त्यांच्या सुरक्षित तात्पुरत्या निवाऱ्याची, खाण्याची, पिण्यायोग्य पाण्याची, प्रभावी तात्काळ औषध योजना राबवणे, भविष्यातील साथीच्या रोगांचे संकट टाळण्यासाठी मृत अवशेषांची विल्हेवाट वगरे.
भारतात १९९९मध्ये आपत्ती व्यवस्थापन ही देशपातळीवरील समिती स्थापन करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत मोठय़ा प्रमाणावर होणारी जीवितहानी रोखणे मुख्य म्हणजे या उद्दिष्टाला प्राधान्य देऊन योग्य त्या योजना राबवणे हे या मागील प्रमुख उद्दिष्ट होते. परिणामस्वरूप २००४ सालच्या त्सुनामी संकटानंतर ‘कल्पकम’ या समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या व देशाचे महत्त्वपूर्ण अणू ऊर्जा प्रकल्प असलेल्या गावात सरंक्षक िभत उभारली गेली. याचीच पुढली पायरी म्हणून २३ डिसेंबर २००५ रोजी ‘नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ ही भारताच्या गृह खात्याच्या अखत्यारीतील संस्था स्थापन झाली. याच धर्तीवर राज्याराज्यांत ‘स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट’ संबंधात उपशाखा स्थापण्यात आल्या. मुख्य म्हणजे २००५ साली केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापनासंबंधी कायदाही लागू केला.
आपत्कालीन व्यवस्थापन अधिक परिणामकारकरीत्या राबविण्यासाठी उपलब्ध शक्यतांचा पुरेपूर वापर करणे, संबंधित संस्थांना एकत्र आणून सकारात्मक कार्य घडवून आणणे, संकटाची व्याप्ती व गांभीर्य ओळखणे, आपत्ती स्थळाचे सखोल भौगोलिक ज्ञान मिळवणे, तेथील स्थानिकांची मानसिकता जाणून घेणे, या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात.
भारतासारख्या भव्य भौगोलिक विस्तार असलेल्या व प्रचंड लोकसंख्येच्या देशात नसíगक व मानवनिर्मित आपत्ती वारंवार उद्भवत असतात, साहजिकच देशाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या प्राधान्यक्रमामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभावी मनुष्यबळाची निर्मिती करणे कायम अग्रक्रमावर राहिले आहे, म्हणूनच अनेक सरकारी तसेच खासगी शिक्षण संस्थातील अभ्यासक्रमातून ‘आपत्ती व्यवस्थापन’ विषयाचा अंतर्भाव झालेला दिसतो.
अतिशय वेगाने वाढणाऱ्या या कार्यक्षेत्रात योग्य प्रशिक्षित उमेदवारांची गरज वाढते आहे. हे शिक्षण घेतलेल्या व्यक्ती सरकारी, खासगी आपत्ती व्यवस्थापन विभाग, या प्रकारच्या शैक्षणिक संस्थांतून प्रशिक्षक, आपत्ती व्यवस्थापनविषयक सल्लागार कंपन्या, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेन्ट, सार्क डिझास्टर मॅनेजमेन्ट, इंडिया मेटरोलॉजिकल डिपार्टमेंट, सेंटर ऑफ डिझास्टर मॅनेजमेन्ट, इंडियन अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिटय़ूट, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, नॅशनल रिमोट सेिन्सग सेंटर अशा सरकारी संस्थांत नोकरी मिळवू शकतात.वरील प्रकारचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तींची रिहॅबिलिएशन वर्कर, सोशल वर्कर, डिझास्टर ऑफिसर, प्रशिक्षक, सíव्हस रिस्पॉन्स मॅनेजर, कन्सल्टन्सी तज्ज्ञ अशा पदांवर वर्णी लागू शकते.
या विषयातील शिक्षणक्रम व त्यांची ओळख खालीलप्रमाणे-
०     मास्टर ऑफ सायन्स इन डिझास्टर मॅनेजमेंट
    पात्रता- पदवीधर, कालावधी- दोन वष्रे, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई.
०     ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेंट
    पात्रता- पदवीधर, कालावधी- एक वर्ष, पुणे युनिव्हर्सटिी.
    याच प्रकारचा शिक्षणक्रम सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सटिी, वडोदरा आणि उत्कल युनिव्हर्सटिी, भुवनेश्वर, ओरिसा येथेही चालविला जातो.
०     सर्टिफिकेट कोस्रे इन डिझास्टर मॅनेजमेंट-
    पात्रता- १०+२ उत्तीर्ण, कालावधी- सहा महिने ते दोन वर्षे, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सटिी.
०     पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेंट –
    पात्रता पदवीधर, कालावधी एक ते चार वष्रे,
      इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सटिी.
०     एम.बी.ए. डिझास्टर मॅनेजमेंट
    पात्रता- पदवीधर (४५% प्राप्त), कालावधी- दोन वष्रे, नॉर्थपोल इन्स्टिटय़ूट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन, राजकोट,
     देवी अहिल्या युनिव्हर्सटिी, मध्य प्रदेश.
०     एम.एस.सी. कोस्टल अ‍ॅण्ड डिझास्टर मॅनेजमेंट
    पात्रता- सायन्स विषयातील पदवीधर किंवा समकक्ष पदवी ५०% गुणांसह, कालावधी- दोन वष्रे, पॉन्डिचेरी युनिव्हर्सटिी (पुद्दुचेरी).
०     पीएच.डी. डिझास्टर मॅनेजमेंट-
    पात्रता- मास्टर्स/ पोस्ट ग्रज्युएट ५५ % गुणांसह सावीथा युनिव्हर्सटिी-  चेन्नई, तामिळनाडू.  
०     सिव्हिल डिफेन्स अ‍ॅण्ड डिझास्टर मॅनेजमेंट, दोन आठवडे, नॅशनल सिव्हिल डिफेन्स कॉलेज, नागपूर.   
०     इंडस्ट्रिअल डिझास्टर मॅनेजमेंट- दोन आठवडे, नॅशनल सिव्हिल डिफेन्स कॉलेज, नागपूर.
०     अर्थक्वेक डिझास्टर रिस्पॉन्स- तीन आठवडे, नॅशनल सिव्हिल डिफेन्स कॉलेज, नागपूर.   
०    फ्लड/ सायक्लोन डिझास्टर रिस्पोन्स- पाच आठवडे, नॅशनल सिव्हिल डिफेन्स कॉलेज, नागपूर.
०     यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी- या राज्य सरकार अंगीकृत संस्थेतून सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट द्वारा संबंधित सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनविषयक शिक्षण दिले जाते.
०     मुंबई विद्यापीठाचा ‘टाइम्स सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट’ हा ‘टाइम्स फौंडेशन’ आणि ‘युनिव्हर्सटिी ऑफ मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेला उपक्रम असून, निरनिराळे शिक्षणक्रम राबवून आपत्ती पूर्वतयारीसाठी योग्य मनुष्यबळ विकसित करणे, त्याचबरोबर संशोधनात्मक प्रकल्प राबवून आपत्तीस्थळी दळणवळण व संपर्क साधने पूर्ववत करण्यासाठी अभ्यासपूर्ण आपत्तीपूर्व योजना निर्माण करणे हे यामागील प्रमुख हेतू राहिले आहेत. अधिक माहितीसाठी timesfoundation@indiatimes.com संपर्क साधा. एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड डिझास्टर मिटीगेशन, क्रुशिअल इश्युज इन डिझास्टर मॅनेजमेंट,
डिझास्टर कौन्सेिलग असे तीन कोस्रेस चालवले जातात.                                       
कालावधी- तीन ते पाचमहिने. अर्धवेळ  अभ्यासक्रम. आठवडय़ाला चार तास.                                                                  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Should assist trained hands