Bank Recruitment 2022: स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ने विकास कार्यकारी (DE) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. १७ जुलै २०२२ पर्यंत उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन मुलाखतीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

पदसंख्या

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण २५ पदे भरली जातील, ज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये २ पदे, बिहारमध्ये १ पद, झारखंडमध्ये १ पद, ओडिशामध्ये 1 पद, तेलंगणामध्ये १ पद, मध्य प्रदेशात १ पद, छत्तीसगडमध्ये १ पदाचा पश्चिम बंगालमध्ये २ पदे, तामिळनाडूमध्ये १ पद, उत्तराखंडमध्ये १ पद, राजस्थानमध्ये १ पद, आंध्र प्रदेशमध्ये १ पद, आसाममध्ये ३ पदे, जम्मू-काश्मीरमध्ये २ पदे, लडाखमध्ये १ पद, हिमाचल प्रदेशमध्ये १ पद, यामध्ये अंदमान आणि निकोबारमधील १ पद, महाराष्ट्रातील २ आणि पंजाबमधील १ पदाचा समावेश आहे.

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Nitin Gadkari
गडकरींकडून प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Jobs in Latur city bank jobs in Latur
Jobs News 2024 : लातूरकरांसाठी ‘अधिकारी’ पदावर नोकरीची संधी! ‘या’ बँकेत होणार भरती…
IGI Aviation Bharti 2024
१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी! IGI एव्हिएशनकडून १०७४ जागांसाठी भरती, एवढा मिळणार पगार

(हे ही वाचा: Maharashtra Jobs: सरकारी नोकरीची संधी! ८०० पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या अधिक तपशील)

शैक्षणिक पात्रता

उद्योजकीय मानसिकता असलेले व्यावसायिक आणि IRMA, XIMB, TISS, IIFM, DMI, ISDM, APU किंवा इतर तत्सम राष्ट्रीय स्तरावरील संस्थांसारख्या नामांकित संस्थांमधून विकास व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन / सामाजिक कार्यातील पदव्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

(हे ही वाचा: दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी! टपाल जीवन विमा मध्ये विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखत)

अनुभव

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ग्रामीण उपजीविका, सामाजिक संशोधन, ग्रामीण विपणन, देखरेख आणि मूल्यमापन इत्यादींमध्ये किमान २ वर्षांचा अनुभव असावा. या पदांसाठी कोणत्याही वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

(हे ही वाचा: Jobs 2022: नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चरमध्ये भरती; अर्जप्रक्रिया सुरु)

निवड निकष

ऑनलाइन घेण्यात येणाऱ्या शॉर्टलिस्टिंग आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.