scorecardresearch

Job Alert: वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर इथे ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या अधिक तपशील

अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

Job Alert: वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर इथे ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या अधिक तपशील
सोलापूर जॉब अलर्ट (फोटो:witsolapur/fb)

वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूरने फॅकल्टी रिक्रूटमेंट २०२१ ची अधिसूचना जाहीर केली. पात्र उमेदवार ईमेल आणि पोस्टल द्वारे ३० दिवसांच्या आत अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

संस्थेचे प्रोफाइल:

वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधनातील अग्रगण्य स्वयं -वित्तपुरवठा करणारी संस्था SAPDJ पाठशाला ट्रस्ट (Estb. 1885) यांनी १९८३ मध्ये स्थापन केली. संस्था उद्योगाच्या सध्याच्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार तांत्रिक शिक्षण देण्यासाठी उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी वचनबद्ध आहे.

पदाचे नाव:

प्राचार्य

रोजगाराचा प्रकार:

पूर्ण वेळ

पात्रता:

एआयसीटीईच्या निकषांनुसार (AICTE norms)

उमेदवार प्रोफाइल:

उमेदवाराने त्यांचे संबंधित विषयात पीजी/पीएचडी पूर्ण केले पाहिजे.
कामाप्रती बांधिलकी हवी.

नोकरीचे ठिकाण:

सोलापूर, महाराष्ट्र

वेतनमान:

AICTE च्या निकषांनुसार

कसा अर्ज करणार?

ईमेल आणि पोस्टल पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज कसा करावा:

इच्छुक उमेदवार आपला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह खालील ईमेल पत्त्यावर आणि पोस्टल पत्त्यावर ३० दिवसांच्या आत पाठवू शकतात.

ईमेल पत्ता:

principal.witsolapur@gmail.com

टपालाचा पत्ता:

मा. सचिव, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर, P.B.No.634, वालचंद हिराचंद मार्ग, अशोक चौक, सोलापूर – 413006 (महाराष्ट्र)

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-09-2021 at 10:14 IST

संबंधित बातम्या