केंद्र सरकारच्या अपंग विद्यार्थी विकास मंत्रालयातर्फे अपंग विद्यार्थ्यांना पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्रताधारक विद्यार्थी -उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिष्यवृत्तींचा तपशील – या योजनेअंतर्गत एक हजार शिष्यवृत्त्या देण्यात येतात. यापैकी ३० टक्के शिष्यवृत्त्या महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.
अर्हता – अर्जदारांनी व्यावसायिक विषयांसह पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. त्यांच्या पालकांचे मासिक एकत्रित उत्पन्न २५ हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. अर्जदार अन्य कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी नसावेत आणि त्यांच्याकडे अपंगत्वाचा दाखला असावा.
शिष्यवृत्तीची रक्कम – योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी दरमहा २,५०० रु. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दरमहा तीन हजार रु. शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येतील. याशिवाय या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार दरवर्षी अनुक्रमे सहा हजार रु. व १० हजार रु. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी देण्यात येतील.
अधिक  माहिती – या शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी नॅशनल हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉपरेरेशनच्या   http://www.nhidc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या योजनेअंतर्गत संबंधित पात्रताधारक विद्यार्थी वर्षभरात केव्हाही अर्ज करून योजनेचा लाभ मिळवू शकतात.
अर्ज पाठविण्याची मुदत – अर्ज नॅशनल हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉपरेरेशन, एनएचएफडीसी, रेड क्रॉस भवन, सेक्टर- १२, फरिदाबाद १२१००७ (हरियाणा) या पत्त्यावर पाठवावेत.