कर्मचारी निवड आयोग (SSC) कॉन्स्टेबल (General Duty) आणि रायफलमन (General Duty) पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच संपत आहे. इच्छुक उमेदवार एसएससी जीडी कॉन्स्टेबल २०२१ भरतीसाठी अधिकृत वेबसाइट ssc.nic.in किंवा ‘उमंग अॅप’ द्वारे अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२१  आहे. १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर रिक्त जागा आहेत.

सचिवालय सुरक्षा दल (SSF) मध्ये SSC GD कॉन्स्टेबल रिक्त जागा ऑल इंडिया बेसेसवर भरल्या जातील. विविध राज्य/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांनुसार CAPF मध्ये इतर रिक्त जागा भरल्या जातील.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
bhandara, new voters, senior citizens, Names Missing Voter List, polling in bhandara, bhandara polling, polling station, polling news, marathi news, lok sabha 2024, bhandara news, election
भंडारा : नवमतदारांसह ज्येष्ठांची नावे यादीतून गहाळ, अनेकजण मतदानापासून वंचित
male candidates Kalyan
कल्याण लोकसभेत ‘ईडी’ची पीडा टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या पुरुष उमेदवारांची माघार?
What is the income of BJP candidate Anup Dhotre from Akola
अकोल्यातील भाजप उमेदवार अनुप धोत्रेंचे उत्पन्न किती? जाणून घ्या सविस्तर…

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), इंडो तिबेटीयन सीमा पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बाल (एसएसबी), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सचिवालय सुरक्षा दल (एसएसएफ) आणि आसाम रायफल्स अंतर्गत एकूण २५,२७१ पद उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, सीमा रक्षक जिल्हे आणि सैन्य/ नक्षल प्रभावित जिल्ह्यांसाठी रिक्त जागा निश्चित केल्या आहेत जे केवळ या जिल्ह्यांच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती २०२१ : महत्वाच्या तारखा

अधिसूचना दिनांक: १७ जुलै २०२१

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑगस्ट २०२१

ऑफलाइन चलान तयार करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: ४ सप्टेंबर २०२१

चलान द्वारे पेमेंट करण्याची शेवटची तारीख (बँकेच्या कामकाजाच्या वेळी): ७ सप्टेंबर २०२१

निवडलेल्या उमेदवारांना SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा २०२१ साठी बोलावले जाईल ज्यासाठी तारखा नंतर अधिसूचित केल्या जातील.

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती २०२१: पात्रता

एसएससी जीडी कॉन्स्टेबल २०२१ साठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून मॅट्रिक किंवा १० वी उत्तीर्ण असावे.

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती २०२१: वयोमर्यादा

उमेदवारांचे वय १८  वर्षे ते २३ वर्षे दरम्यान असावे.

एसएससी जीडी कॉन्स्टेबल वेतन लेव्हल ३ – २१७०० रुपये  ते ६९१०० रुपये असेल

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती २०२१: अर्ज फी

जनरल पुरुष – १०० रु

महिला/एससी/एसटी/माजी सैनिक – कोणतेही शुल्क नाही

रिक्त जागा

बीएसएफ: ७५४५, सीआयएसएफ: ८४६४, एसएसबी: ३८०६, आयटीबीपी: १४३१, एआर: ३७८५ एसएसएफ: २४०