scorecardresearch

SBI Jobs 2022: विविध पदांसाठी भरती! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या इच्छुकांना लेखी परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागणार आहे.

SBI Recruitment 2022
नोकरीची संधी (प्रातिनिधिक फोटो )

SBI Jobs 2022: बहुतांश तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न असते. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI Recruitment 2022) विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. अर्ज करून उमेदवार त्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करू शकतात. यासाठी अर्जाच्या तारखाही स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत दोन्ही द्यावे लागणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या इच्छुकांना लेखी परीक्षा आणि मुलाखत यासारखे कठीण टप्पे पार करावे लागतील. दोन्ही फेरीतील यशस्वी उमेदवारांना गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल. तुम्हालाही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्टेट बँक मधील या रिक्त जागांसाठी अर्ज करायचा असेल, तर निवड प्रक्रिया जाणून घ्या.

(हे ही वाचा: MCGM Recruitment 2022: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी, पगार ७५,००० रुपये)

पदांचा तपशील

  • कार्यकारी – १७ पदे
  • वरिष्ठ कार्यकारी – १२ पदे
  • वरिष्ठ विशेष कार्यकारी – ११ पदे
  • सिस्टम ऑफिसर – ७ पदे
  • मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – १ पद
  • उपाध्यक्ष आणि प्रमुख – १ पद

महत्वाच्या तारखा

१. वीपी आणि वरिष्ठ विशेष कार्यकारी पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ मे २०२२

२. सिस्टम ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, सीनियर एक्झिक्युटिव्ह, सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह आणि चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसरसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मे २०२२

अर्जाची फी

एसबीआयमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या इच्छुकांना शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी एसबीआयच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: State bank of india recruitment 2022 know about application process ttg