महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील मुसलमान, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी व जैन या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थाना बारावीनंतर तंत्रज्ञान-व्यावसायिक विषयांसह उपलब्ध असणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थी वर नमूद केलेल्या अल्पसंख्याक समुदायातील व खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत-
अर्जदार महाराष्ट्र राज्याचे कायम निवासी असावेत व त्यांनी शालान्त परीक्षा महाराष्ट्रातून उत्तीर्ण केलेली असावी.
अर्जदार विद्यार्थी इतर कुठल्याही शिष्यवृत्ती-पाठय़वृती योजनेचे लाभार्थी नसावेत.
विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक- एकत्रित उत्पन्न २.५ लाख रुपयांहून अधिक नसावे.
विशेष सूचना : एकूण उपलब्ध शिष्यवृत्तींपैकी ३०% शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत.
उपलब्ध विषय व तपशील : या योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी खालील विषयांचा समावेश आहे-
१०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीनंतर उपलब्ध असणारे कला, वाणिज्य व विज्ञान क्षेत्रातील अभ्यासक्रम.
तंत्रज्ञान- अभियांत्रिकीमधील पदवी वा पदविका अभ्यासक्रम, इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम, फार्मसी, आर्किटेक्चर यांसारख्या विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम, अप्लाइड आर्ट्स, कृषी, व्यवस्थापन, एमसीए, एमबीए, एमएमएस यांसारखे अभ्यासक्रम इ.
अधिक माहिती व तपशील : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाच्या दूरध्वनी क्र. ०२२-२२६१७९६९ वर संपर्क साधावा अथवा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in/scholarships अथवा  http://www.dirhe.org.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर असून संगणकीय पद्धतीने केलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण संस्थेत जमा करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०१३ आहे.