बीएमएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षांच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षेत मला एका विषयात एटीकेटी लागली आहे. मला भविष्यात एमबीए करायचे आहे. केटी असल्यास एमबीएची परीक्षा देता येते का? मी केटी उत्तीर्ण केली तर एमबीएसाठी मला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का?
 – सागर मोहिते.
कोणत्याही विषयातील पदवी ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे ही अर्हता एमबीए प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी आवश्यक असते. त्यामुळे तू आधी तुझे उर्वरित विषय उत्तम गुणांनी उत्तीर्ण हो, तरच तुला सीईटी परीक्षा देता येईल. एमबीए अभ्यासक्रमासाठी दर्जेदार महाविद्यालयात प्रवेश मिळण्याकरता सीईटीचे गुण ग्राह्य धरले जातात. त्यामुळे तिथे उत्तम गुण मिळवून गुणवत्ता यादीत अव्वल क्रमांक मिळवणे गरजेचे असते.

 

मी सध्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांत शिकत आहे. मला अभियांत्रिकीतील आणि स्पर्धा परीक्षेतील संधी कोणत्या आहेत, त्याविषयी माहिती द्यावी.
– शिवाजी गुट्टे.

स्पर्धापरीक्षेद्वारे तुम्हाला पुढील संधी मिळू शकतात-
६ राज्य लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागासाठी कनिष्ठ अभियंता,  उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता अशा पदांसाठी निवड केली जाते.
इंडियन इंजिनीअिरग सíव्हस ही परीक्षा देऊन केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये उत्तम नोकरी मिळू शकते. ६ काही मोठय़ा महानगरपालिका स्वतंत्रपणे त्यांच्या बांधकाम व पायाभूत सुविधासारख्या विभागांसाठी या अभियंत्यांची पदे भरत असतात. ६ सिडको, म्हाडा, एमएमआरडीए यांनाही स्थापत्य अभियंत्याची गरज भासते.
गेट परीक्षेत उत्तम गुण मिळवल्यास सार्वजनिक क्षेत्रातील काही उद्योगांमध्ये आणि कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. ६ सार्वजनिक बँकांमधील नोकरीकरता प्रोबेशनरी ऑफिसर  परीक्षा देता येते.
संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेद्वारे आयएएस, आयपीएस अशा वरिष्ठ पदांसाठी नियुक्ती मिळू शकते. राज्य लोकसेवा आयोगार्फत घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, विक्रीकर अधिकारीवर्ग एक/दोन, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी यांसारख्या पदांवर नियुक्ती मिळू शकते.

मी बीएस्सी प्रथम वर्षांला आहे. मला भौतिकशास्त्रात संशोधन करायचे आहे. मला त्यासाठी काय करावे लागेल? मला इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळेल का?
– हृषीकेश काळे.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भौतिकशास्त्रात संशोधन करण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी सध्या पदवी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करावे आणि त्यात उत्तम गुण मिळवावे. सध्या तुला इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळू शकत नाही. मात्र, पदवी परीक्षेनंतर तू जॉइन्ट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर एमएस्सी ही परीक्षा देऊ शकतोस. त्याद्वारे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स येथे इंटिग्रेटेड पीएच.डी. अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. वेगवेगळ्या आयआयटीमध्ये एमएस्सी, एमएस्सी-पीएच.डी., एमएस्सी-एमटेक, एमएस (रिसर्च)/ पीएच.डी. अशा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. या परीक्षेला बसण्यासाठी पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

या वर्षी माझ्या मुलाने बारावीनंतर बीएस्सी फॉरेन्सिक सायन्सला प्रवेश घेतला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कुठल्या करिअर संधी मिळू शकतील?
– झाकीर सांडे.

हा अभ्यासक्रम केल्यावर केंद्र सरकार, फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळा, पोलीस विभाग, गुन्हे शाखा,  प्रादेशिक फॉरेन्सिक प्रयोगशाळा, न्यायालये, क्वालिटी कंट्रोल ब्युरो, नार्कोटिक्स विभाग, रुग्णालये, लष्कर, बँक आदी शासकीय क्षेत्रात संधी मिळू शकते. त्याशिवाय खासगी क्षेत्रातील गुप्तहेर संस्था, खासगी बँका, विमा कंपन्या, विधी कंपन्या, सुरक्षा सेवा संस्था यांमध्येसुद्धा जेनेटिक्स एक्स्पर्ट, फॉरेन्स्कि एक्स्पर्ट, फॉरेन्सिक मेडिकल एक्झामिनर, फॉरेन्सिक सायंटिस्ट, एन्व्हायरॉन्मेन्टल अनॅलिस्ट, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर,  िफगरिपट्र एक्स्पर्ट, क्राइम सिन इन्व्हेस्टिगेटर, फॉरेन्सिक सायकॉलॉजिस्ट, हॅण्डरायटिंग एक्स्पर्ट, फॉरेन्सिक इंजिनीअर, डॉक्युमेंट एक्स्पर्ट, क्राइम रिपोर्टर, डॉक्युमेंट एक्झामिनर, फॉरेन्सिक कन्सल्टंट, फ्रॉड एक्झामिनर,  सिक्युरिटी ऑफिसर आदी नोकऱ्या मिळू शकतात. पदव्युत्तर पदवी अथवा त्यानंतरही अभ्यासक्रम पूर्ण केल्यास आणखी उत्तम संधी प्राप्त करता येतील. अहमदाबादच्या गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्‍‌र्हसिटीने विविध पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

संपर्क- http://www.gfsu.edu.in

मी सध्या बीकॉम पूर्ण करत आहे. माझे वय २६ असून मी सन्यात भरती होऊ शकतो का? त्याबद्दल मला माहिती द्यावी.
– प्रशांत सोनवणे.
आपले सध्याचे वय लक्षात घेता सन्यात प्रवेश कठीण वाटतो.

मी सध्या बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला आर्किऑलाजी क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यासाठीच्या अभ्यासक्रमांची माहिती द्यावी.
– अभिमन्यू कर्वे, चिपळूण.

हा अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या काही संस्था- डिपार्टमेंट ऑफ एन्शन्ट हिस्ट्री, कल्चर अ‍ॅण्ड इंडियन आíकऑलॉजी- नागपूर विद्यापीठ, वसंतराव नाईक शासकीय कला आणि समाजशास्त्र महाविद्यालय- नागपूर, डेक्कन कॉलेज- पुणे, स्कूल ऑफ सोशल सायन्स- सोलापूर, सेंट झेवियर कॉलेज- मुंबई, दिल्ली इन्स्टिटय़ूट ऑफ हेरिटेज रिसर्च अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, शांती निकेतन- कोलकाता, सेंटर फॉर आíकऑलॉजी स्टडीज अ‍ॅण्ड ट्रेिनग- कोलकाता, डिपार्टमेंट ऑफ एन्शन्ट हिस्ट्री अ‍ॅण्ड आíकऑलॉजी, एम. एस. युनिव्हर्सटिी- वडोदरा, गुजरात.

मी २०१५ मध्ये मेकॅनिकलमध्ये बीई केले आहे. शासकीय क्षेत्रात नोकरीच्या कोणत्या संधी आहेत?
 – श्याम माळोदे.

आपल्याला विविध शासकीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकेल. मात्र, त्याकरता अशा कंपन्याच्या मेकॅनिकल शाखेतील रिक्त जागांकडे लक्ष ठेवावे लागेल. अशा रिक्त जागांची माहिती जाहिरातींद्वारे एम्प्लॉयमेंट न्यूज/ रोजगार समाचार या केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित साप्ताहिकांमध्ये आणि इतर मोठय़ा वृत्तपत्रांमध्ये वेळोवेळी प्रकाशित केली जाते. याशिवाय आपण इंडियन इंजिनीअिरग सíव्हस परीक्षा देऊन केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नोकरी मिळवू शकता. लष्कराच्या तिन्ही शाखांना मेकॅनिकल शाखेच्या अभियंत्यांची गरज भासते. पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. पूर्ण केल्यास आपल्याला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये/ आयआयटी/ एनआयटीमध्ये प्राध्यापक पदही उपलब्ध होऊ शकेल.
मी २०११ मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात बीए पदवी प्राप्त केली. त्यात मला ४२ टक्के गुण मिळाले. मला टक्केवारी वाढवण्याकरता पुन्हा पदवी परीक्षा द्यायची आहे, कारण मला एमबीए करायचे आहे.  मी पुन्हा परीक्षा देऊ शकतो का?
– सुनील कल्याण.

आपल्याला पुन्हा परीक्षा देता येणार नाही. एमबीए करण्यासाठी आपल्याला सीईटी परीक्षा द्यावी लागेल. त्यासाठी पदवी परीक्षेत किमान ४५ टक्के गुण आवश्यक असतात. त्यामुळे आपण मुक्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी घेऊन ४५ टक्के गुण मिळवावेत.

मला ट्रॅव्हल आणि टुरिझम या विषयात अल्प शुल्क आकारणाऱ्या शासकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम करायचा आहे.
 – नीता गुजर.

६ मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेत दोन वष्रे कालावधीचा डिप्लोमा इन टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाची फी प्रतिसत्र १२ ते १३ हजार रुपये आहे.

संपर्क- http://www.giced.edu.in
तेलंगणा शासन आणि केंद्र सरकारचे सहकार्य लाभलेल्या डॉ. वाय.एस.आर. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या संस्थेने बीबीएइन ट्रॅव्हल अ‍ॅण्ड मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी. या अभ्यासक्रमाची वार्षिक फी ५० हजार रुपये आहे.

संपर्क – http://www.nithm.ac.in

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल  मॅनेजमेंट या संस्थेने एमबीए इन टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.दोन वष्रे कालावधीच्या या अभ्यासक्रमाचे शुल्क १ लाख ९० हजार रुपयांपर्यंत जाते. संपर्क- http://www.iittm.net या अभ्यासक्रमाचा खर्च भागवण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळू शकते.

मी सध्या बी.टेक फूड टेक्नॉलॉजीच्या पहिल्या वर्षांला शिकत आहे. मला जीआरइविषयी माहिती हवी आहे. फूड टेक्नॉलॉजीमधून एमटेक करणे उत्तम ठरेल का?
– मधुरा भागवत.

जीआरई- ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन ही अमेरिका आणि इतर इंग्रजी बोलणाऱ्या राष्ट्रांमध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संगणक आधारित घेतली जाणारी परीक्षा आहे. ज्या केंद्रांवर संगणकाची सुविधा नसेल त्या ठिकाणी कागद-पेन प्रकारातील परीक्षाही घेतली जाते. या परीक्षेमध्ये व्हर्बल रिझिनग, क्वान्टिटेव्हिव्ह रिझिनग आणि अ‍ॅनालिटिकल रायटिंग या तीन विषयांवर प्रश्न विचारले जातात. परीक्षेचा कालावधी साधारणत: तीन तासांचा असतो. या परीक्षेतील आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी वर्षभराच्या कालावधीत पाच वेळा ही परीक्षा देता येते.

संपर्क-  ६६६.ी३२.१ॠ

भारतातील एमटेक अभ्यासक्रमासाठी गेट- ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनीअिरग ही परीक्षा द्यावी लागते. आपल्याला परदेशात शिक्षण घ्यायचे आहे की देशातच उच्च शिक्षण घ्यायचे आहे हे आधी निश्चित करावे. आयआयटी, एनआयटी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, काही शासकीय महाविद्यालये, काही खासगी महाविद्यालयांमध्ये नक्कीच चांगल्या दर्जेदार शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे आपली मानसिकता, आíथक परिस्थिती आणि परदेशातील वातावरणात जुळवून घेण्याची तयारी याबाबीही प्रवेशाचा निर्णय घेताना महत्त्वाच्या ठरतात. ल्ल ल्ल

अभ्यासक्रम, करिअर संधीविषयक

आपले प्रश्न

career.vruttant@expressindia.com

या पत्त्यावर पाठवावेत.