शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी आवश्यकतेनुसार किमान एकदा घेण्यात येईल. या परीक्षेत दोन स्तर करण्यात आले आहेत. यात कनिष्ठ प्राथमिक स्तर पहिली ते पाचवी आणि वरिष्ठ प्राथमिक सहावी ते आठवी या दोन गटांतील शिक्षकासाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहील. कनिष्ठ  प्राथमिक स्तरासाठी उमेदवार हा उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण हवा. तसेच मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षांची पदविका म्हणजेच डी. टी. एड्. उत्तीर्ण असायला हवा.
वरिष्ठ प्राथमिक स्तरासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ४५ टक्के गुणांसह आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील पदवी म्हणजेच बी.ए. /बीएस्सी- बी.एड्. उत्तीर्ण असायला हवा. पदवी उत्तीर्ण व उमेदवार दोन्ही स्तरांच्या परीक्षा देऊ शकतो. दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील.
या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व काठिण्य पातळी ही अनुक्रमे माध्यमिक व उच्चमाध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहील. राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षांत प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षांना बसण्याची मुभा राहील. या परीक्षेत किमान ६० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराला उत्तीर्ण मानले जाईल. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना उत्तीर्णतेसाठी ५५ टक्के गुण आवश्यक ठरतील. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राची वैधता सात वर्षांची राहील. गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी या परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येईल. मात्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही.
जे उमेदवार ही परीक्षा देणार नाहीत किंवा अनुत्तीर्ण होतील ते शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाहीत. ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेवारांना नियमाप्रमाणे नोकरीसाठी अर्ज करावा लागेल व नियमाप्रमाणे पात्र ठरल्यास नोकरीत नियुक्ती देण्यात येईल.
 शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी
या दोन्ही प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व काठिण्यपातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित आहे.
कनिष्ठ प्राथमिक शिक्षक
(पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी)
(पेपर १) : एकूण गुण – १५०, कालावधी – २ तास ३० मि.
पात्रता : बारावी + डी. एड्./ डी.टी.एड्. किंवा समकक्ष

घटक -१) बालविकास व शिक्षणशास्त्र
गुण- ३०, प्रश्न – ३०
बालविकासाचा अर्थ, बालविकासाची तत्त्वे – विकासाचे स्वरूप, वाढ आणि विकासाचा अर्थ, बालकाच्या विकासावस्था –  जन्मपूर्व अवस्था, नवजात अवस्था- विकासाची दिशा, विकासप्रक्रियेची तत्त्वे व वैशिष्टय़े, शैशवावस्था (एक महिना ते सहा वष्रे)- शैक्षणिक महत्त्व, किशोरावस्था- (६ ते १२ वष्रे)- शैक्षणिक महत्त्व, पौगंडावस्था (१२ ते १८) – शैक्षणिक महत्त्व, आनुवंशिकता व पर्यावरणाचा प्रभाव, मेंडेलचे नियम, वातावरणाचा परिणाम,  सामाजिकीकरण, शिक्षणात समाजाचा सहभाग, पियाजे, कोहलबर्ग आणि व्हगोत्सकी (Piaget, kohlberg and vygotsky), बुद्धिमत्ता, बहुआयामी बुद्धिमत्ता, सर्वसमावेशक शिक्षण, अध्ययन व शिक्षणशास्त्र, अध्यापनाची उद्दिष्टे/ हेतू, राज्य अभ्यासक्रम आराखडय़ातील महत्त्वाची तत्त्वे, देशातील शैक्षणिक पाश्र्वभूमी, राज्यातील शालेय शिक्षणाच्या विविध स्तरांसाठी स्वतंत्रपणे कार्यरत सुविहित यंत्रणा, बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा (२००९), जीवनकौशल्यांतून व्यक्तिमत्त्व विकास आणि मूल्यमापन, शालेय अभ्यासक्रमातील महत्त्वाचे बदल, शालेय शिक्षणाची ध्येय साध्य करण्यासाठी प्राथमिक स्तरावरील शिक्षणाची सर्वसामान्य उद्दिष्टे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सर्वसारण उद्दिष्टे, अध्ययन प्रक्रियेद्वारा बदलती आव्हाने स्वीकारण्यास महत्त्वाच्या बाबी व शिफारशी, शैक्षणिक मूल्यमापन, मूल्यमापन साधने, सध्याच्या मूल्यमापन प्रक्रियेतील उणिवा, शिक्षणाचा हक्कविषयक कायदा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ातील अपेक्षा इत्यादी घटकांवर परीक्षेत प्रश्न विचारणे अपेक्षित आहे.  
घटक – २) मराठी व अध्यापनशास्त्र किंवा उर्दू  – प्रश्न- ३०, गुण- ३०
मराठी- गद्य आकलन, पद्य आकलन, अलंकार, वृत्ते, प्रयोग, समानार्थी व विरुद्धार्थी, म्हणी, वाक् प्रचार, विभक्ती, काळ, वाक्यांचे प्रकार, साहित्य लेखक व कवी, समास, शब्दांच्या जाती संवादावरील प्रश्न, वर्णमाला.
मराठी अध्यापनशास्त्र – मराठी भाषेचे जीवनातील व अभ्यासक्रमातील स्थान व महत्त्व, भाषा विषयाची क्षेत्रे आणि क्षमता, साहित्यप्रकारांचा आस्वाद, मराठी विषयाच्या पाठय़पुस्तकांचे ज्ञानशाखीय विश्लेषण, संबोधांची मांडणी, अध्यापन पद्धती व तंत्रे, भाषा विषयाच्या अध्यापन पद्धती, अध्यापकाचे नियोजन व मूल्यमापन, शिक्षक भूमिका व वैशिष्टय़, प्रात्यक्षिकांसह दिलेल्या सर्व घटकांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण परीक्षेला बहुपर्यायी पद्धतीने विद्यार्थ्यांना सामोरे जायचे आहे.
घटक  ३) English &  Methodology – प्रश्न ३०, गुण ३०
भाषा – इंग्रजी, अभ्यासक्रम – (1) Unseen Passage (Prose) (2) Unseen Passage (Poetry) (3) Pedagogy of Language Development – What is language, Functions of language, Difference between acquisition and learning, Cognitivism, Stages of learning, Acquisition stage, Fluency/ proficiency stage, Maintenance stage, Generalization stage, Adaptation stage, Language acquisition, Principle of language teaching, Role of listening and speaking, Integrating metacognitive strategies, During and after listening, After listening, Using authentic materials and situations, one way communication, Two way communication, strategies for developing speaking skills, Using minimal responses, Recognizing scripts, Using language to talk about language, Role of grammar in learning a language, Goals and techniques for teaching grammar, Overt grammar instruction, Relevance of grammar instruction, Traditional, Communicative competence, Error correction, Challenges of teaching in a diverse classroom, Learning styles in a diverse classroom, Language skills, Listening, Listening situations, Micro skills, Speaking, Speaking situations,  Reading, Writing, Assessing language skills, Teaching learning material, Characteristics of various types of instructional material, Requisite and evaluation of a good text book, (4) Role of  grammar, Methods of teachig grammar, Objectives of remedial teaching programme (RTP), Principles of helping pupils with learning difficulties, The process of remedial teaching, Curriculum adapatation, Homework policies, Formulation of  teaching plans, Teaching activities, aids and supporting materials, The setting of learning environment, remedial teaching strategies individualized educational programme (IEP), Peer support programme, Reward scheme, Handling pupils behaviour problems, Development of generic skills, Assessment and record on learning, Liaison with parents, Co- ordination with other teachers and  professionals (5) Basic grammer with vocabulary.                                                                    
घटक – ४) गणित व अध्यापनशास्त्र  – प्रश्न ३०, गुण ३०
गणित व गणित अध्यापनशास्त्रामध्ये ३० गुणांची विभागणी केली असता अंक गणितावर ९ ते १० प्रश्न, बीजगणितावर पाच प्रश्न, भूमितीवर पाच ते सहा प्रश्न व गणित अध्यापन शात्रावर ९ ते १० प्रश्न अपेक्षित आहेत.
१. अंकगणित – (अ) पायाभूत गणित- पूर्णाक, अपूर्णाक, दशांश अपूर्णाक, आवर्ती… इ. विभाज्यतेच्या कसोटय़ा, संख्याज्ञान व क्रिया, वर्ग, वर्गमूळ, घन – घनमूळ, घातांक व करणी इत्यादी घटकांवर प्रश्न अपेक्षित आहे. (ब) लसावि – मसावि, शेकडेवारी, सरासरी, नफा-तोटा, सरळ व्याज – चक्रवाढ व्याज, वयवारी इत्यादी घटकांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. (क) सांख्यिकी – मध्यमान मध्यांक बहुलक, परिमाणे, पोष्ट व नाणे, शेअर्स, वारंवारिता (ड) काळ काम व वेग – रेल्वे, बोगदे व पूल, नळ, टाकी व हौद, मिश्रण .
२. बीजगणित- एकचल समीकरणे, बजिक राशीची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार, बजिक राशीचा विस्तार, बजिक राशीचे अवयव, एकपदी- बहुपदी.
३. भूमिती – रेषा, कोन- भूमितीचे मूलभूत संबोध, त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार, त्रिकोणाचे गुणधर्म, त्रिकोणाची एकरूपता, समरूपता व त्यावरील उदाहरणे. चौकोन – चौकोनाचे प्रकार व उदाहरणे, समांतर रेषा, पायथॅगोरसचा सिद्धांत, वर्तुळ- वर्तुळाचे गुणधर्म वर्तुळकंस, वर्तुळ जीवा आणि स्पíशका व त्यावरील उदा., महत्त्वमापन- परिमिती – क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ सूत्रे व त्यावरील उदाहरणे, त्रिकोणमिती, भौमितिक प्रमेयाच्या सिद्धांतावर आधारित, निर्देशक भूमिती.
४. गणित अध्यापनशास्त्र- गणित विषयाचे स्थान व महत्त्व – गणित विषयाचे दैनंदिन जीवनातील स्थान व महत्त्व, गणित विषयाचे प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमात स्थान व महत्त्व, गणित व इतर विषयांचे सहसंबंध, विज्ञानातील विविध शाखाशी संबंध – गणित व विज्ञान, गणित आणि रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र, गणित आणि सामाजिकशास्त्र याचा सहसंबंध, गणित आणि वाणिज्य भाषा व ललित कला यांचा संबंध, गणित विषयाची संरचना- गणित विषयातील शाखा व उपशाखांचा परस्पर संबंध, गणित विषयाची संरचना, इयत्ता पहिली ते आठवीच्या पाठय़क्रमातील संबोध व तत्त्वे, निम्न प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील गणिताचा अभ्यासक्रम- निम्न प्राथमिक स्तरावरील गणित विषयाची उद्दिष्टे (पहिली ते पाचवी), निम्न प्राथमिक स्तरावरील उद्दिष्टे व पाठय़क्रम यांचा समन्वय, उच्च प्राथमिक स्तरावरील उद्दिष्टे व पाठय़क्रम यांचा समन्वय, माध्यमिक स्तरावर उपयुक्त असणाऱ्या निम्न व उच्च प्राथमिक स्तरावरील संबोधांचे  दृढीकरण व उपयोजन. पाठय़क्रमाची समकेंद्र मांडणी – पहिली ते आठवी गणित पाठय़क्रमाचे समकेंद्र पद्धतीनुसार विश्लेषण, संगणकाच्या साहाय्याने आशयातील नवी माहिती
पाठय़पुस्तके-  शिक्षक/विद्यार्थी व पालक यांच्या संदर्भात पाठय़पुस्तकांचे महत्त्व, इयत्ता पहिली ते पाचवी गणित विषयातील आशय व उद्दिष्टे यांचा संबंध, उच्च प्राथमिक स्तरावरील गणिताच्या पाठय़पुस्तकातील आशय व उद्दिष्टे यांचा संबंध, एका घटकातील आशयाचे परीक्षण
गणित विषयाच्या अध्यापनाचे नियोजन महत्त्व व आवश्यकता – अध्यापनाचे नियोजन, महत्त्व व आवश्यकता, आशययुक्त पाठनियोजन
गणितातील अध्यापन पद्धती व तंत्रे – गणित अध्यापन पद्धती उद्गामी व अवगामी पद्धती (Inductive & deductive method),पृथक्करण व संयोजन पद्धती (Analytic method), प्रायोगिक पद्धती (Laboratory method), समस्या निराकरण किंवा कूटप्रश्न पद्धती, सादरीकरण पद्धती (Demonstration method)), पर्यवेक्षित अभ्यास व स्वाध्याय, प्रतिमाने – संकल्पनाप्राप्ती, स्मरण प्रतिमान, गणित अध्यापनाची शैक्षणिक साधने, गणिती खेळ, अभ्यासपूरक कार्यक्रम, मूल्यमापन (Evalution) निकषाधारित चाचण्या (Criterion reference test), चाचण्या, र्सवकष मूल्यमापन, सातत्यपूर्ण मूल्यमापन, उपचारात्मक अध्ययन – अध्यापन, घटक चाचणी, आराखडे, चाचणीचे संपादन, उत्तरसूची व गुणदान योजना, तोंडी परीक्षा (महत्त्व, आयोजन, गुण व दोष), प्रात्यक्षिक परीक्षा, स्वाध्याय,
गणिती शिक्षक – गणित विषयाच्या शिक्षकाची भूमिका व वैशिष्टय़े, गणित शिक्षकाच्या अंगी असणाऱ्या क्षमता, गणित शिक्षक संघटना व हस्तपुस्तिका, गणिती दृष्टिकोन इत्यादी घटकांवर भावी शिक्षकांना अभ्यास करणे गरजेचे आहे.
घटक – ५) परिसर अभ्यास   – प्रश्न – ३०, गुण – ३०
अ) पर्यावरण अभ्यास – कुटुंबमित्र, अन्न, निवास, पाणी, प्रवास, मानवनिर्मित उपयोगी वस्तू व सेवा, पर्यावरण अध्यापनातील संकल्पना व वाव, पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण शिक्षणपद्धती, पर्यावरणाचा विज्ञान व सामाजिकशास्त्रांशी सहसंबंध, संकल्पना सादरीकरणाच्या पद्धती, प्रयोग आणि प्रात्याक्षिक कार्य, शैक्षणिक साहित्य, पर्यावरण शिक्षणातील अडचणी, सातत्यपूर्ण व र्सवकष मूल्यमापन.
ब) विज्ञान – जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, सामान्य विज्ञान,
शोध – शोधक,
क) (इतिहास)- इतिहास विषयाचे जीवनातील स्थान, इतिहास विषय संरचना व संबंध, इतिहास विषयाच्या पाठय़क्रमाची उद्दिष्टे व क्रमिक, इतिहास विषय अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने व नियोजन, इतिहास विषय शिक्षकांची गुणवैशिष्टय़े व कौशल्ये, मूल्यमापन.
ड) (नागरिकशात्र)- नागरिकशास्त्र विषयाचे अभ्यासक्रमातील स्थान व महत्त्व, नागरिकशास्त्र विषयाच्या पाठय़क्रमाची उद्दिष्टे व क्रमिक पुस्तके, पाठय़पुस्तके
(भूगोल) – भूगोल विषयाचे स्थान व महत्त्व, भूगोल विषय संरचना व संबंध, भूगोल विषय अध्यापन पद्धती, भूगोल विषय शिक्षकांची गुणवैशिष्टय़े, शैक्षणिक साधने व नियोजन, कौशल्य व मूल्यमापन.
वरील दिलेल्या अभ्यासक्रमानुसार भावी शिक्षक विद्यार्थ्यांनी अचूक संदर्भ ग्रंथाचे वाचन करणे आवश्यक आहे. त्यासाठी शक्यतो विद्यार्थ्यांनी डी. एड., बी. एड. अभ्यासक्रमावरील पाठय़पुस्तके, विविध विद्यापीठाची तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची अभ्यासक्रमावर आधारित काही पुस्तके अभ्यासल्यास विद्यार्थ्यांना टी.ई.टी. परीक्षेत चांगली मदत मिळू शकते.
वरील सर्व विषयांच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न विचारले जाणे अपेक्षित आहे.
वरिष्ठ प्राथमिक शिक्षक (सहावी ते आठवी वर्गासाठी) – (पेपर – २)
एकूण गुण – १५०, कालावधी – २:३० तास (महाराष्ट्र राज्य परीक्षेत दिलेल्या सूचनापत्र परिशिष्ट अ नुसार)
पात्रता – पदवी + डी.एड./ डी.टी.एड. किंवा पदवी + बी.एड./ बी.पी.एड.
अभ्यासक्रम –
१. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न- ३०, गुण- ३०
२.  मराठी भाषा किंवा उर्दू  प्रश्न- ३०, गुण- ३०,
३.  English &  Methodology  प्रश्न- ३०, गुण- ३०
४.  दोन विषयांपकी एक विषय घेणे अनिवार्य आहे. पदवीला सामाजिकशास्त्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिकशास्त्र घेणे अनिवार्य आहे. तसेच गणित व विज्ञानमध्ये पदवी संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान घेणे अनिवार्य आहे. इतर विषयांत पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोघांपकी एक घेणे अनिवार्य आहे.
अ.  गणित व विज्ञान – प्रश्न – ६०, गुण – ६०  किंवा
ब.  सामाजिकशास्त्र – प्रश्न – ६०, गुण ६० सामाजिकशास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे ६० प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिकशास्त्रातील संकल्पन, आशय व अध्यापन शास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर मधील संबंधित विषयाचा पाठय़क्रम लागू राहील.
संदर्भ –
० प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहावी ते आठवी व पाठय़क्रम
० प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठय़क्रम
० प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित पहिली ते बारावीची पाठय़पुस्तके
० प्रचलित बी. एड्. अभ्यासक्रम व पाठय़क्रम                      
gopaldarji21@gmail.com

How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
Changes in Composite Assessment Test Exam Schedule
संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा वेळापत्रकात बदल
How Much Expenditure on Salary of Retired Contract Teachers
सेवानिवृत्त निवृत्त कंत्राटी शिक्षकांच्या मानधनावर किती खर्च? जाणून घ्या सविस्तर…