नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नागपूर येथे उपलब्ध असणाऱ्या थर्मल पॉवर प्लँट इंजिनीअरिंग विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २०१५-१६ या सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत –
जागांचा तपशील – भ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ५७० असून, त्यापैकी काही जागा सरकारी नियमानुसार राखीव आहेत.
शैक्षणिक अर्हता – उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक अथवा पॉवर इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा
उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते संबंधित पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा २८ जून २०१५ रोजी घेण्यात येईल.
अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क – अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून १२०० रु. इन्स्टिटय़ूटच्या संकेतस्थळावर संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी, इन्स्टिटय़ूटच्या  http://www.npticet.com   या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत – विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज प्रिन्सिपल डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, दक्षिण अंबाझरी मार्ग, गोपाळनगर, नागपूर- ४४००२२ या पत्त्यावर ३० मे २०१५ पूर्वी पाठवावेत.