यूपीएससीची तयारी : सुरक्षा

भारतात जमावाची हिंसा एक गंभीर कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या म्हणून उदयास येत आहे.

श्रीकांत जाधव
प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील सुरक्षा या घटकाची परीक्षाभिमुख सर्वंकष तयारी कशी करावी, याविषयी चर्चा करणार आहोत.या घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न

२०२० मध्ये या घटकातील डावा उग्रवाद (Left Wing Extremism), अंतर्गत सुरक्षा, पाकिस्तान आणि बांगलादेश सोबतचा सीमावाद आणि याची सुरक्षा करणाऱ्या संस्थांची भूमिका, सीमांचे  परिणामकारक व्यवस्थापन इत्यादी महत्त्वाच्या मुद्दयांवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

डावा उग्रवाद (Left Wing Extremism) यामध्ये उतरता कल (downward trend) दिसून येत आहे, पण अद्यापही देशाच्या अनेक भागांत याचा प्रभाव आहे. डाव्या उग्रवादामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारत सरकारने अंगीकारलेल्या दृष्टिकोनाचे थोडक्यात स्पष्टीकरण करा. (२०१८)

भारतात जमावाची हिंसा एक गंभीर कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या म्हणून उदयास येत आहे. योग्य उदाहरण देऊन, यासारख्या हिंसेची कारणे आणि परिणामांचे विश्लेषण करा. (२०१७)

दुर्गम भूभाग आणि काही देशांसोबत असणाऱ्या शत्रुतापूर्ण संबंधांमुळे सीमा व्यवस्थापन हे एक कठीण कार्य बनलेले आहे. प्रभावी सीमा व्यवस्थापन आणि रणनीतीवर प्रकाश टाका. (२०१६)

डिजिटल मीडियासारख्या माध्यमातून धार्मिक उपदेशाच्या परिणामस्वरूप भारतीय युवक आय.एस.आय.एस. (ISIS) मध्ये सहभागी होत आहेत. आय.एस.आय.एस. (ISIS) हे काय आहे आणि याचे ध्येय काय आहे? आय.एस.आय.एस. हे आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला कशा प्रकारे धोका पोहोचवू शकते? (२०१५)

‘भारताचे बहुधार्मिक आणि बहुवांशिक विविधतापूर्ण समाजस्वरूप हे शेजारील देशांमध्ये पाहावयास मिळणाऱ्या मूलतत्त्ववादी प्रभावापासून मुक्त नाही.’ यासारख्या वातावरणाचा प्रतिकार करण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या रणनीतीसह चर्चा करा. (२०१४)

अवैध पैसा हस्तांतरण देशाच्या आर्थिक सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी एक धोका आहे. भारतासाठी याचे काय महत्त्व आहे आणि या धोक्यापासून वाचण्यासाठी कोणती पावले उचलणे आवश्यक आहे? (२०१३)

उपरोक्त प्रश्नांवरून असे दिसून येते की, सुरक्षा या घटकाची तयारी करताना देशाच्या अंतर्गत आणि बा सुरक्षेच्या समोर नेमकी कोणती आव्हाने आहेत व यापासून देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला नेमका कोणता धोका आहे आणि या आव्हानांना यशस्वीरीत्या परतवून लावण्यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती असणे आवश्यक आहे.

सुरक्षा विषयाचे परीक्षाभिमुख आकलन

सुरक्षा या विषयाची व्याप्ती मोठी आहे, भारताला बा व अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. बा सुरक्षा म्हणजे परकीय राष्ट्राकडून केल्या जाणाऱ्या आक्रमणापासून देशाची सुरक्षा करणे होय. अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या सीमाअंतर्गत असणारी सुरक्षा ज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था व देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवणे इत्यादी मुद्दे येतात. भारतात अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयांवर आहे आणि बा सुरक्षेची जबाबदारी संरक्षण मंत्रालयावर आहे. दीर्घकाळापासून जम्मू आणि काश्मीर हा प्रदेश दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांनी ग्रासलेला आहे. तसेच ईशान्येकडील राज्ये घुसखोरी व वांशिक चळवळी, संघटित गुन्हेगारी, सीमेपलीकडून अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी इत्यादी समस्यांनी ग्रस्त आहेत. सद्यस्थितीमध्ये दहशतवाद आणि दहशतवादी कारवाया देशाच्या अनेक राज्यांमध्ये घडत आहेत. धार्मिक दंगे, भाषिक वाद, राज्याराज्यांतर्गत असणारे वाद, नवीन तंत्रज्ञान अर्थात मोबाइल, इंटरनेट, सोशल नेट्वर्किं ग साइट्स यामुळे एखाद्या विशिष्ट द्वेषपूर्ण विचारसरणीचा प्रसार करणे यासारख्या घटना घडत आहेत. याचबरोबर २०२० मध्ये भारताचा सीमावादाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. विशेषकरून चीन व नेपाळ या देशासोबतचा व यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका पोहोचण्याची शक्यता  आहे.  यांसारख्या आव्हानात्मक समस्या देशातील एकतेला बाधा पोहोचवत आहेत. ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षेला प्रचंड मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. सुरक्षा या घटकामध्ये भारताच्या बा आणि अंतर्गत सुरक्षासंबंधी मुद्दयांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीचा दहशतवाद अर्थात नक्षलवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यांमध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सीमासंबंधी असणारे वादविवाद, संघटित गुन्हेगारी, अवैध पैसा हस्तांतरण, सीमेवर अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी आणि याचे असणारे संघटित स्वरूप, सततचे होणारे भाषिक वाद, राज्या-राज्यांतर्गत असणारे वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षा संबंधित मूलभूत माहिती, माध्यमे आणि सोशल नेटवर्किंग साइटस यांचा वापर ज्याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला निर्माण होणारा धोका, सुरक्षिततेला निर्माण होणारे आव्हान इत्यादी बाबी आहेत.  त्याचबरोबर या आव्हानांना सामोरे जाताना भारत सरकारने आखलेली रणनीती ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबविणे, सीमेलगतच्या भागाचा विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश यात होतो. तसेच  देशाची बा आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना व त्यांना नेमून दिलेले कार्य याचबरोबर सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना अभ्यासाव्यात.

या घटकावर नोटस स्वरूपातील अनेक गाईड्स उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासता येते. तसेच दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे दहशतवाद आणि नक्षलवाद यावरील अहवाल पाहावेत, या घटकाशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी ‘इंडियन एक्स्प्रेस’, योजना आणि वर्ल्ड फोकस ही मासिके आणि केंद्रीय  परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, कऊरअ यांचे संके तस्थळ याचा वापर करावा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Upsc exam 0 1 preparation of upsc exam zws 70

ताज्या बातम्या