विक्रांत भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृत्तीसंबंधीच्या काही मूलभूत संकल्पना आणि वृत्तीचा वर्तनाशी असलेला संबंध याबद्दल आपण मागील दोन लेखांत चर्चा केली. या विषयाशी संबंधित प्रश्न जेव्हा विचारले जातात, तेव्हा ते काही वेळा थेट तर अनेकदा अप्रत्यक्षरीत्या या संकल्पनांचा वापर करून उत्तर देता येईल, अशा प्रकारचे असतात. थेट प्रश्न अर्थातच समजून घ्यायला आणि त्याला धरून उत्तर लिहायला तुलनेने सोपे असतात. मात्र अप्रत्यक्ष प्रश्नांबाबतीत संकल्पना समजून घेण्याबरोबरच त्याचे वास्तवात उपयोजन काय आहे? याचा सखोल विचार उमेदवारांनी केलेला असणे अपेक्षित आहे. या लेखात आपण वृत्तीसंबंधित विचारल्या गेलेल्या भाग अ मध्ये येणाऱ्या काही प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. या प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केल्यास एकंदर यूपीएससीचा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आंतरविद्याशाखीय आहे हे लक्षात येते.

(१) Young people with ethical conduct are not willing to come forward to join active politics. Suggest steps to motivate them to come forward. (२०१७, १५० words, १० Marks)

(१) नीतिमत्ता पूर्ण आचरण असलेला तरुण वर्ग हा पुढे येऊन सक्रिय राजकारणामध्ये सहभागी होण्यास इच्छा दर्शवित नाही. तरुण वर्गाला यासंबंधी प्रोत्साहित करणारे उपाय सुचवा. (२०१७, १५० शब्द, १० गुण)

(२) Our attitudes towards life. work, other people and society are generally shaped unconsciously by the family and the social surroundings in which we grow up. Some of these unconsciously acquired attitudes and values are often undesirable in the citizens of a modern democratic and egalitarian society.

(a)Discuss such undesirable values prevalent in todayks educated Indians.

(b) How can such undesirable attitudes be changed and socio-ethical values considered necessary in public services be cultivated in the aspiring and serving civil servants?   (२०१६, १५० words, १० marks)

(२) आपली आयुष्याबद्दल, कामाबद्दल, इतर लोकांबद्दल आणि समाजाबद्दल असणारी वृत्ती ही सर्वसामान्यपणे आपले कुटुंब आणि आपला सामाजिक सभोवताल यामध्ये वाढ होत असताना नकळतपणे वळण घेते. यातील नकळतपणे संचित झालेल्या काही वृत्ती आणि मूल्ये अनेक वेळा आधुनिक लोकशाहीवादी, समताधिष्ठित समाजातील नागरिकांस अनिष्ट असतात.

(अ) आजच्या सुशिक्षित भारतीयांमध्ये अस्तित्वात असणाऱ्या अशा अनिष्ट मूल्यांची चर्चा करा.

(ब)आपण कशाप्रकारे होतकरू व सेवेत असणाऱ्या नागरी सेवकांमध्ये अस्तित्वात असणाऱ्या अनिष्ट वृत्तींना बदलून गरजेच्या असणाऱ्या
सामाजिक-नैतिक मूल्यांचे संवर्धन करू शकतो?  (२०१६, १५० शब्द, १० गुण)

(३) What factors affect the formation of a personls attitude towards social problems? In our society, contrasting attitudes are prevalent about many social problems.  What contrasting attitudes do you notice about the caste system in our society? How do you explain the existence of these contrasting attitudes?   (२०१४, १५० words, १० marks)

(३) सामाजिक समस्यांबाबत व्यक्तीच्या वृत्तीमध्ये कोणकोणत्या गोष्टींमुळे जडणघडण होते? आपल्या समाजात अनेक सामाजिक समस्यांबाबत अनेक विसंगतवृत्ती अस्तित्वात आहेत. आपल्या समाजातील जाती व्यवस्थाबद्दल कोणत्या प्रकारच्या विसंगत वृत्ती आपल्या निदर्शनास येतात? अशा विसंगत वृत्तींचे समाजातील अस्तित्व आपण कशा प्रकारे स्पष्ट कराल?   (२०१४, १५० शब्द, १० गुण)

(४) We are witnessing increasing instances of sexual violence against women in the country. Despite existing legal provisions against it, the number of such incidences is on the rise. Suggest some innovative measures to tackle this menace. (२०१४, १५० words, १० marks)

(४) आपण आपल्या देशामध्ये स्त्रियांविरुद्ध लैंगिक हिंसेच्या वाढत्या घटनांना सामोरे जात आहोत. अशा घटनांविरुद्ध कायदेशीर तरतूद अस्तित्वात अशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. अशा समस्येला तोंड देण्यासाठी काही अभिनव उपाय सुचवा. (२०१४, १५० शब्द, १० गुण) पुढील लेखात सामाजिक मानसशास्त्रातील पुढचा विषय म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचा आपण विचार करणार आहोत.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc exam preparation strategy article about upsc exam preparation zws
First published on: 21-10-2021 at 01:02 IST