Mahavitaran Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. या कंपनीत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक संधी उपलब्ध झाली आहे. कारण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने अप्रेंटिस पदाच्या एकूण ५३ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी महावितरण कंपनी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करत आहे. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव व रिक्त पदे –
पदाचे नाव | शाखा | रिक्त पदे |
वीजतंत्री | ४३ | |
अप्रेंटिस | तारतंत्री | १० |
कोपा | ६ |
एकूण रिक्त पदे – ५३
शैक्षणिक पात्रता –
- १० वी पास तसेच संबंधित विषयात ITI.
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.
- मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी – कोणतीही फी नाही.
नोकरीचे ठिकाण – भंडारा.
अधिकृत बेवसाईट – https://www.mahadiscom.in/
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १४ सप्टेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1ROCFsAev8-7WHylHuuzjbV9d4wk_UuFV/view) या लिंकवरील जाहीरात अवश्य पाहा.