जे तरुणांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे आणि जे अशा नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने काही पदांसाठीच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ज्यानुसार SBI मध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरच्या पदावर भरती केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकच्या माहितीसाठी https://bank.sbi/careers ही अधिकृत बेवसाइटावर बॅंकेकडून नोकरी संबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे. या बेवसाइटवर इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ फेब्रुवारी २०२३ ही देण्यात आली आहे.

हेही वाचा- Job Alert: गुप्तचर विभागात १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी, भरती कधी आणि कशी होणार ? जाणून घ्या

कोणत्या पदांसाठी किती जागा –

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) च्या १० जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरु केली जात आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA/PGDM आणि इतर विहित पात्रता आणि संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा असे पात्रता निकष बॅंकेकडून ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा- Job Alert: सोशल मीडिया मॅनेजर व्हायचंय? ‘या’ २० कंपन्यांमध्ये मिळू शकते जॉबची संधी, पाहा यादी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

SBI भरती २०२३ – वयोमर्यादा

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २५/३३/३८ वर्षांच्या दरम्यान आणि पदानुसार कमाल वय ४०/४५/५० वर्षांच्या दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया

शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल, निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीसाठी एकूण १०० गुण निर्धारित केले आहेत. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक असेल.

भरतीसाठी अर्ज शुल्क –

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. यासाठी उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

SBI भरती 2023: अर्ज कसा कराल ?

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट bank.sbi/careers ला भेट देऊन अंतिम तारखेपूर्वी भरतीसाठी अर्ज करावा. अधिक तपशीलांसाठी उमेदवार बॅंकेच्या अधिकृत बेव साइटची मदत घेऊ शकतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A great opportunity for those who want to work in a bank sbi will be recruiting for the post of sco jap
First published on: 27-01-2023 at 17:49 IST