Airport Authority Of India Recruitment 2024: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ITI शिकाऊ, पदवीधर शिकाऊ आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवाराच्या १९७ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

AAI Apprentice Recruitment 2024: पात्रता

Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Forest Minister Ganesh Naik assurance regarding the name of Navi Mumbai International Airport
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव; वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
Transport Minister Pratap Sarnaik said private passenger transport providers like Ola Uber Rapido brought under one regulation
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार, परिवहन मंत्री
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
Nagpur airport loksatta news
नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या शिकाऊ पदांवर भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून चार वर्षांचे नियमित अभियांत्रिकी पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किवा एनसीव्हीटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

AAI Apprentice Recruitment 2024: वयोमर्यादा

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या या पदांसाठी अर्ज करण्याच्या वयोमयदिबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २६ वर्षे असावे. तसेच, येथे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात विशेष सूट दिली जाईल.

AAI Apprentice Recruitment 2024: किती पगार मिळेल?

भारतीय विमानतळ प्राधिकरणात एका वर्षाच्या कालावधीसाठी शिकाऊ म्हणून निवडलेल्या उमेदवारांना स्टायपेंड मिळेल. या पदांसाठी निवडलेल्या पदवीधर प्रशिक्षणार्थीना दरमहा १५००० रुपये स्टायपेंड मिळेल, तर डिप्लोमा प्रशिक्षणार्थीना दरमहा १२,००० रुपये स्टायपेंड मिळेल. तसेच ITI ट्रेड प्रशिक्षणार्थीला ९,००० रुपये प्रति स्टायपेंड दिला जाईल.

AAI Apprentice Recruitment 2024: उमेदवारांची निवड कशी केली जाईल?

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या या रिक्त पदांवर गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल, यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीत यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. याशिवाय अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

हेही वाचा >> Railways Recruitment 2024: रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; १७८५ पदांवर बंपर भरती, पात्रता काय? जाणून घ्या

कसा कराल अर्ज?

सर्व प्रथम भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
मुख्यपृष्ठावर AAI Apprentice Recruitment 2024 लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुमचे वयक्तीक तपशील भरून नोंदणी करा
यानंतर तुमच्या मोबाईलवर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड येईल.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा आणि अर्ज पूर्णपणे भरा.
अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
यानंतर आवश्यक असलेले अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. अर्जाची प्रिन्ट काढून घ्या आणि तुमच्याकडे ठेवा

Story img Loader