AAI Bharti 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airport Authority Of India) अंतर्गत ‘पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ उमेदवार’ पदांच्या एकूण १८५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करु शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ उमेदवार




एकूण पदसंख्या – १८५
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर/डिप्लोमा : मान्यताप्राप्त संस्थेतून चार वर्षांची पदवी किंवा तीन वर्षांचा (नियमित) डिप्लोमा आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे ITI/NCVT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.
वयोमर्यादा – १८ ते २६ वर्षे
हेही वाचा- कोकण रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरु, पदवीधर, इंजिनीअर्स आणि डिप्लोमा उमेदवार करु शकतात अर्ज
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३ डिसेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/
असा करा अर्ज –
- उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा.
-अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा. - उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
- उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1Qv_rlDs5E-ZliUcYcCMlacLmnCBMkYjm/view